जळगांव दि. १ ऑक्टोबर २३ रविवार रोजी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ ची वार्षिक सर्व साधारण सभा तसेच गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त समाज बांधव यांचा सन्मान केला गेला. या प्रसंगी जळगांव चे खासदार श्री. उन्मेषजी पाटील व जळगांव शहराचे चे लाडके आमदार श्री. राजुमामा भोळे हे उपस्थित होते. या दोघानी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात करियर व घरगुती जीवन कसे जगावे याचे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच समाजाने संगठित कसे रहावे हे सांगितले. या प्रसंगी जळगांव तालुका बीजेपी अध्यक्ष श्री. गोपालजी भंगाळे, जळगांव तालुका पंचायत समिति सदस्य ऍड श्री. हर्षल चौधरी व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष श्री उमेश आप्पा करोड़पती सर उपस्थित होते. या वेळी त्यांचे देखील मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विकासशेठ बडगुजर, उपाध्यक्ष श्री. सुरेश जी महाले,सचिव श्री. बिपीन जी पठार, वसतिगृह अधीक्षक श्री. ललितकुमार बडगुजर, श्री. राजेंद्र पवार, सौ. ज्योति बडगुजर, सौ. शीतल बडगुजर, सौ. छाया बडगुजर, परशुराम बडगुजर, श्री. लिलाधर बड़गुजर, श्री. पी.डी.बडगुजर सर, श्री. बाबूलाल बडगुजर, श्री. संजय बडगुजर, श्री. दिलीप बडगुजर, श्री. नंदलाल पवार, श्री. दत्तात्रय नामदेव बडगुजर, श्री. दत्तात्रय निंबा बडगुजर, श्री. योगेश कोतवाल, श्री. विजय बडगुजर, श्री. हेमचंद्र बडगुजर व समाजाचे आजी व माजी पदाधिकारी व समाज बंधू, भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनतर वार्षिक सर्वसाधारण सभा ही श्री. विकास भाऊ बडगुजर यांचे अध्यक्षते खाली सुरु होऊन त्यांनी प्रत्येक प्रश्नांचे समाधान कारक उत्तरे दिलीत तसेच बडगुजर विद्याप्रसारक मंडळाने सर्वानुमते वधुवर परिचय मेळावा घेण्यात यावा हा ठराव पारित करण्यात आला.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रम बडगुजर. इन च्या माध्यमातून लाईव्ह दाखविण्यात आला. त्यासाठी बडगुजर. इन चे सदस्य श्री. उमेश बडगुजर जळगांव, आय. टी. तज्ञ श्री. अविनाश बडगुजर व श्री. मनिष बडगुजर यांचे सहकार्य लाभले. सदरील कार्यक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.

Leave a Reply