आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
समाजिक कार्यक्रम (Functions)
गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनीचा सत्कार बक्षीस वितरण सोहळा – श्री. प्रकाश धुडकु बडगुजर, शिक्षण समिती प्रमुख
अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती अंतर्गत अखिल भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती तर्फे व बडगुजर समाज पंचमंडळ अमळनेर यांच्या सहकार्याने सर्व समाज बांधवांना कळविण्यात […]
धरणगांव बडगुजर समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा
धरणगांव, बडगुजर समाज पंच मंडळाच्या वतीने दि. ०३/०७/२०२४ वार बुधवार रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या प्रतिमेची […]
नवी मुंबई बडगुजर समाज मंडळातर्फे महिला दिन व स्नेह मेळावा निसर्ग रम्य वातावरणात साजरा
बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल व कोकण परिसर यांच्या वतीने “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून रविवार १० मार्च २०२४ रोजी स्नेह मेळावा व विविध कार्यक्रमांचे […]
नवी मुंबई बडगुजर समाज मंडळातर्फे जागतिक महिला दिन आणि स्नेह-मेळावा
बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल व कोकण परिसर यांच्या तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दिनांक. 10 […]
सोनशेलु येथे कुलस्वामिनी एक मुखी चामुंडा मातेचा भव्य यात्रात्सोव -श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू
सोनशेलु येथील नवसाला पावणारी जुनागड येथिल प्रतिकृती एक मुखी कुलस्वामिनी चामुंडा मातेचा भव्य यात्रात्सोव तिथी- माघ शु.बिज दि.11/02/2024 वार- रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. […]
शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न – डॉ. वृषाली अतुल बडगुजर, शिरपूर
शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ तर्फे दिनांक 7/2/2024 रोजी शहरातील गुजर मंगल कार्यालय, निमझरी नाका, येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीनगराध्यक्षा ताईसो.सौ. संगिताताई देवरे तसेच प्रमुख पाहुणे सौ. सीमाताईरंधे, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्या ,धुळे,सौ. माधुरीताई बडगुजर, सौ. साधनाताई बडगुजर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे वअध्यक्षा यांनी प्रतिमापूजन केले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कु. रुत्विका विशाल बडगुजर हिच्या श्रीगणेश वंदना नृत्याविष्काराने करण्यातआली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ वृषाली बडगुजर यांनी प्रास्ताविकातून हळदीकुंकू कार्यक्रममचा उद्देश व शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ 2014 पासून सातत्याने हा कार्यक्रम साजरा करीत आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यातसर्वप्रथम मा. सौ.सीमाताई रंधे यांनी महिलानी कशा प्रकारे आपलेआरोग्यावर लक्ष दिले पाहिजे यासाठी विविध उदा. देउन मार्गदर्शन केले. तसेच सौ. साधनाताई यांनी महिला नोकरी सांभाळून घर देखील उत्कृष्ट सांभाळत असतात पण त्याच बरोबर स्वत:च्या आरोग्यावर व आहारावर लक्ष दिले पाहिजे हे सांगून शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळाचे कौतुक करत रुपये 501 मंडळासाठी जाहीर केले. अध्यक्षीय भाषणात मा. सौ. संगिताताई देवरे यांनी उत्कृष्ट उदा. देउन जुन्या परंपरा आणि नवीनगोष्टीं यांची सांगड घालत समाजातील सर्व महिला कशा पद्धतीने कामकरू शकतात हे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. हळदीकुंकूकार्यक्रमाबरोबरच उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळविणार्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. प्रतिभा अर्जुन बडगुजर व सौ. संगिता विशाल बडगुजर यांनी केलले . तर आभार प्रदर्शन सौ. वंदना प्रमोदरघुवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्याध्यक्षसौ. ज्योती सुनील बडगुजर , सदस्या सौ. शैला बडगुजर व सर्व महिलामंडळातील सदस्या यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला. यावेळी शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळातील मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री चामुंडा युवक मित्र मंडळ व बडगुजर.इन नाशिक बडगुजर समाज पुस्तिका – २०२४ – श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक
श्री चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक यांच्या वतीने व बडगुजर डॉट इन च्या माध्यमातून नासिक जिल्हा बडगुजर समाज दर्शन पुस्तिका 2024 साठी ऑनलाईन फॉर्म घेण्यासाठी […]
*# बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ-ठाणे,पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई व कोकण परीसर द्वारा बडगुजर दर्शन चा 22 वा दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा,तसेच समाज गुण-गौरव पुरस्कार वितरण सोहळा समारंभ हा दि.०३/१२/२०२३. रविवार रोजी साजरा झाला.
# बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ-ठाणे,पालघर, बृहन्मुंबई, नवी मुंबई व कोकण परीसर द्वारा बडगुजर दर्शन चा 22 वा दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा,तसेच समाज गुण-गौरव पुरस्कार वितरण […]
वधूवर परिचय मेळावा जळगांव – श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वधुवर परिचय मेळावा दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी जळगांव नगरीत सर्व […]