आमच्या विषयी

“संकल्पना”

सर्व समाज एका व्यासपीठावर यावा म्हणून समाजातील सर्व बांधवांनी मिळून हे व्यासपीठची निर्मिती करण्याचे ठरवले !,सर्व समाज बांधव समसमान ! समाजातील सर्वाना घेवून बदल घडवणे हाच प्रमुख उद्देश !

“ध्येय व धोरण “

आजच्या ऑनलाईन युगात आपला बडगुजर समाज ही ऑनलाइन एकमेकांशी जोडले गेला पाहिजे त्यासाठी समाजाचे स्वताचे हक्काचे व्यासपीठ आपण बडगुजर.इन एक समाज एक व्यासपीठ निर्माण करीत आहोत.

आजच्या काळाची गरज ओळखून आम्ही विवाह, विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन, नोकरीतील संधी, व्यवसाय उद्योग मार्गदर्शन तसेच समाजाची डिरेक्टरी बनविणार आहोत.

बडगुजर समाज हा गावातील असो वा शहरातील,परदेशातील सर्व समाज हा आपल्या एक समाज एक व्याससपीठ या माध्यमातून एकमेकाच्या संपर्कात येणार आहे.

समाजातील सर्व सामाजिक संस्थाची माहिती, सामाजिक घडामोडी, मनोरंजन क्षेत्रांतील बातम्या, सर्व समाजासाठी उपयुक्त अशी माहिती हे सर्व विषय आम्ही समाजपर्यंत पोहचविणार आहोत म्हणजे आपल्याला आपला बडगुजर समाज खरा अर्थाने कळण्यास मदत होईल.

मग चला आपणही यात सामील व्हा नवीन बदल घडवण्यास आणि  एक वैचारिक समाज घडवण्यास….

एक समाज एक व्यासपीठ या संकल्पनेतून !

उद्दिष्ट

आजच्या ऑनलाइन युगात आपल्या समाजाची माहिती वेबसाईट व अप्लिकेशन च्या माध्यमातून आणि एक समाज एक व्यासपीठ

संकल्पनेतून समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

समाज सेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य धरून आपण खालील समाजोपयोगी डिजिटल वर्क घेऊन समाजा पुढे येत आहोत आपल्या व्यासपीठावर  सर्व

समाज एक समान असेल, एक समान आपण एक परिवार म्हणून एकत्र येणार आहोत

आपल्या बडगुजर.इन वर असणार आहे.

१) विवाह

 आपल्या उपवर वधु मुलामुलींचे बायोडाटा आपल्याला मोफत  रजिस्टर करता येतील आणि विवाह स्थळ आपल्याला येथे शोधता येईल.

 २) नोकरी

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व उमेदवारांना आपला बायोडाटा अपडेट करता येईल तसेच जॉब ला असणाऱ्या बंधू-भगिनींकडून आपल्या कंपनीत

असलेल्या रिक्त जागांची माहिती टाकता येइल.

३) बिझनेस डिरेक्टरी :

यात संपूर्ण समाजातील उद्योजक आणि व्यावसायिक व्यक्तींची आणि त्यांच्या उद्योगांची माहिती  तसेच नविन उद्योजकांना व्यावसायिक मार्गदर्शन येथे मिळेल.

 ४) समाज डिरेक्टरी

संपूर्ण समाजातील व्यक्तीची एक डिरेक्टरी होणार असून त्यात आपण गाव, तालुका, जिल्हा, राज्य, विदेशातिल  सर्व बंधूंचा संपर्क पत्ता क्षणार्धात शोधू शकणार आहोत

 ५) समाजिक  संस्था /मंडळ

 समाजात कार्य करणाऱ्या सर्व मंडळाची माहिती त्याचे विशेष कार्य मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारणी संपर्क पत्ता नंबर अशी सर्व माहिती आपल्याला बघता येईल.

 ६) बातमी

 समाजातील विशेष घडामोडी आपल्याला इकडे बघता येतील

 ७) मनोरंजन/यशप्राप्ती

समाजातील कलावंत ,गायक, विशेष कला असणाऱ्या बंधू भगिनींचे चे कला सादर केलेले व्हिडीओ आपण इकडे बघू शकतो.

तसेच असे अनेक समाजोपयोगी माहिती देणारे समाजासाठी उपयुक्त असे बडगुजर.इन वेबसाईट व अप्लिकेशन सादर करत आहोत

 आपलाच

बडगुजर.इन

एक समाज एक व्यासपीठ