येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच.करोडपती यांच्या अमृत महोत्सव ”उमेशोत्सव” अंतर्गत तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा व ७५ वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच करोडपती तर प्रमुख पाहुणे सुनील नंदवाळकर (उपविभाग पोलीस अधिकारी, अमळनेर) राहुल निकम, (संचालक सिडबॉल कॅम्पेन), उमेशोत्सव समिती अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर, उमेशोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ.चेतन बडगुजर,मंगला करोडपती, (संचालिका) सुनील बडगुजर, (संचालक) आशिष बडगुजर, (संचालक)पत्रकार संजय पाटील,राधिका बडगुजर,तृप्ती बडगुजर,मंथन बडगुजर, विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,प्राचार्य विजय बडगुजर, स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमा पूजन व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.उमेशोत्सव आयोजित तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे मशाल पेटवून मॅरेथॉन रॅलीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्राथमिक विभागातील हिंदवी पाटीलने गांधीजींच्या रूपात येऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले, इंग्लिश मीडियम विभागातील आर्यन महाजन व माध्यमिक विभागातील वेदिका चौधरी यांनी महात्मा गांधींविषयी भाषण दिले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते “७५ वृक्षारोपण” कार्यक्रमाचे शुभारंभ करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पारोळा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मिडीयम विभागातील ८४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी अध्यक्षांनी व मान्यवरांनी स्पर्धकांना हिरवे झेंडे दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी अतिशय जोमाने उत्साहाने मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला मॅरेथॉन स्पर्धेत गटानुसार गट क्र. 1 मुले सोमनाथ ज्ञानेश्वर पाटील (प्रथम),देवेन हिम्मत महाजन (द्वितीय), संकेत संजय चौधरी (तृतीय) गट क्र २ मुली लावण्या दिलीप चौधरी (प्रथम), वैष्णवी संदीप मराठे (द्वितीय) ,श्रद्धा नानाभाऊ दुसे (तृतीय) , गट क्र. ३ मुलांमधून अजय मधुकर सूर्यवंशी (प्रथम), हर्षल प्रल्हाद पाटील (द्वितीय) ,निलेश सुनील पारधी (तृतीय) गट क्र४ मुलींमधून जानवी दिलीप चौधरी (प्रथम) प्रतीक्षा राजेंद्र शिंपी (द्वितीय)उज्वला रामसिंग पाटील (तृतीय) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मान्यवरांनी सर्व विजय स्पर्धकांचे अभिनंदन व कौतुक केले.यानंतर अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी मनोगतात सांगितले की आज आपल्या उमेशोत्सव अंतर्गत २ किलोमीटर अंतराचे मॅरेथॉन स्पर्धेचे रूपांतर हाफ मॅरेथॉन व त्यानंतर सगळ्यात मोठी ४२ किलोमीटर पर्यंतची मॅरेथॉन स्पर्धेत व्हावी त्या स्पर्धेत नक्की मी धावेल असे प्रतिपादन केले यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच. करोडपती यांनी आपले मनोगत व्यक्त करून मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनेश पाठक प्रास्ताविक हेमंतकुमार पाटील अनुमोदन विश्वास पाटील तर आभार उमेशोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर यांनी मान्यवरांचे तसेच संचालक मंडळ, स्पर्धकांचे व पालकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..


आप्पा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा