चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत सहाय्यक अभियंता श्री. संभाजी बडगुजर यांनी आज जागतिक हृदय दिवशी सायकलिंग तसेच रनिंग दोन्ही मिळून २१ हजार किलोमीटरचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये २ द्विशतकांच्या BRM स्पर्धा, १० शतकं व ११० पेक्षा अधिक अर्ध शतकांचे सायकलिंग राइड समाविष्ट आहेत. त्यांनी चंद्रपूर ते नागपूर, नागपूर ते मध्यप्रदेशातील पिपलपाणी तसेच धुळे ते नाशिक यासोबतच विविध शहरात सायकलिंग करीत जनजागृती केली आहे.
सायकलिंग सोबतच रनिंग मध्ये हाफ मॅरेथॉन २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर अंतराच्या विविध स्पर्धेत त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे.
सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलीच्या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुस, स्नायू, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. रक्ताभिसरण म्हणजे शरीरातील रक्त संचालन व्यवस्थित होते. शरीराचं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते तसेच ताणतणाव देखील कमी करण्यास मदत होतो. यासाठी नेहमी सायकल चालवावी, यासाठी ते निरंतर इतरांना प्रवृत्त करीत असतात.
ऊर्जानगर वसाहतीत ऊर्जा रायडर्स सायकलिंग क्लब द्वारे नियमित सायकलिंग चालू असते. सायकलसाठी इंधन लागत नसल्याने वातावरणात प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण देखील होत नाही.
अशाप्रकारे सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, महिलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आणि वाहतुकीचेही एक साधन आहे. सायकल चालवा-निरोगी रहा तसेच सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा मौल्यवान संदेश त्यांनी जागतिक हृदय दिनाच्यानिमित्त दिला आहे. त्यांच्या प्रेरणादायी उपक्रमाला महानिर्मिती, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. संभाजी बडगुजर – 84118 28288


बडगुजर समाज बहुद्देशीय संस्था. पुणे व प्रदीप राजाराम बडगुजर यांच्या कडून हार्दिक अभिनंदन, व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
Congratulations Mr.Sambhaji Badgujar So Good cycling Record 🎯 “Health is wealth”….