कु. पराग दत्तात्रय बडगुजर हा इन्फोसिस कंपनीतर्फे सँट्युगो (चिली) ला रवाना

✈परदेशगमन✈

कल्याणः येथील श्री. दत्तात्रय गजानन बडगुजर यांचे व्दितीय पुत्र पराग दत्तात्रय बडगुजर हा पुणेस्थित इन्फोसिस कंपनीत कार्यरत असून कंपनीच्या विशेष कामा निमित्त SANTIAGO (Chili) सँट्युगो(चिली) ला सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी रवाना झाला.

कु. पराग हे एक आय. टी. इंजिनिअर असून त्यांनी BE EXTC & CDAC चे शिक्षण – श्रीमती इंदीरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोपरखैरने, नवी मुंबई येथून पुर्ण केले.

कु. पराग सहपरिवार फोटो

कु. पराग हा इन्फोसिस कंपनीत साॕफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पुणे येथे गत ६ महिन्यापासून कार्यरत आहे. कु. पराग हा आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक आणि तत्पर असतो. यामुळेच त्याची या प्रोजेक्ट साठी निवड करण्यात आली.

कु. पराग याचे सर्वत्र अभिनंदन होत असून,श्री. दत्तात्रय गजानन बडगुजर (वडील),सौ.अनिता बडगुजर,(आई),श्री.प्रमोदनाना (काका),सौ.संगीता बडगुजर (काकू),श्रीमती लिलाताई सूर्यवंशी,सौ.विजया बडगुजर, सौ.मगल बडगुजर, मामामामी, मावसामावशी व मित्र परिवारांने विशेष कौतुकाने अभिनंदन केले.
तसेच अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त वेब पोर्टल टीम तर्फे हार्दिक अभिनंदन व भविष्यात भरीव कामगिरीवर नियुक्तीसांठी शुभेच्छा.

कु. पराग विमानतळावर आपल्या परिवारासोबत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*