मुकटी, जि. धुळे येथील समाज बांधव श्री. घनश्याम पंडित बडगुजर प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय सैन्य दलातून दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी सेवानिवृत्त झालेत. ते मुकटी येथील सौ. निर्मला पंडित बडगुजर व श्री. पंडित भिका बडगुजर यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी २० वर्षे सैन्य दलात पुणे, मणिपूर (लेमॅखॉनग), झाँसी, अंबाला, लेह, जम्मू आणि काश्मीर इत्यादी ठिकाणी देशाची सेवा केली.

घनश्याम यांना घरी आणि मित्र परिवार हे नाना म्हणतात. त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण कुर्हे पानाचे येथे पुर्ण केले. ते कुर्हे गावातील श्री. समाधान गोविंदा बडगुजर आणि कुर्हे गावचे विद्यमान सरपंच श्री. रामलाल गोविंदा बडगुजर यांचे भाचे आहेत. मामांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत नाना यांनी भारतीय सैन्य दलाची तयारी केली आणि ते २००३ साली त्याची लखनऊ येथे भारतीय सैन्य दलात निवड झाली.

शिक्षण घेत असतांना गावामध्ये आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे खुप मोठा मित्रपरिवार झाला आणि सर्वांचे ते खुप लाडके मित्र. अतिशय होतकरू आणि चाणाक्ष बुध्दीमत्ता, मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांनी कुर्हे गावालाच आपले गांव समजले. अतिशय जिद्द, धैर्य आणि काहीतरी करण्याच्या इच्छाशक्ती मुळे त्यांनी आपले लक्ष गाढले त्यासाठी कठोर परिश्रम सुध्दा घेतले. ते सेवानिवृत्ती घेऊन जेव्हा घरी परतले तेव्हा कुर्हे गावातील मित्रपरिवार त्यांना रेल्वे स्टेशनवर रिसिव्ह करायला आले होते. तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

आम्हा सर्वाना तुमचा सार्थ अभिमान आहे. आपले पुढील आयुष्य खूप सुखात जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शुभेच्छुक : अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply