उमंग बडगुजर नारी मंच, अमरावती तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

उमंग बडगुजर नारी मंच तर्फे महानगरपालिका शाळा नंबर क्रमांक 8 अमरावती येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हेडमिस्ट्रेस च्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास बडगुजर समाजातील ज्येष्ठ महिलांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते झाडे लावण्याचा कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास विद्या काकू, विजयाताई भेरडे, सुमन दातेराव, गोदावरी काकू, विजया दातेराव, चित्रा दातेराव, मंगला बडगुजर, व इतर ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपणाचे महत्त्व सगळ्यांना माहीतच आहे. हे महत्त्व लक्षात घेता उमंग बडगुजर नारी मंच च्या महिलांनी हा कार्यक्रम आयोजित करून वातावरण शुद्ध करण्यात खारीचा वाटा उचलला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन उमंग बडगुजर नारीमं च्या अध्यक्षा सौ. भारती अजय दातेराव यांनी केले. व सहकार्य कोषाध्यक्ष सौ. नीलाक्षी नितीन दातेराव, उपाध्यक्ष सौ. राधिका अमर भेरडे, उपाध्यक्ष सौ. अंजली गोपाल बडगुजर, सहसचिव सौ. उमा सारंग अलोणे, सौ सारिका भेरडे, शैला दातेराव, सौ.प्राची दातेराव, सौ जया दातेराव, सौ शिल्पा भेरडे, कु. कल्याणी दातेराव, सौ अश्विनी दातेराव, सौ जागृती दातेराव, सौ सुनिता बडगुजर, यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास महानगरपालिका शाळा नंबर ८ चा हेडमिस्ट्रेस,व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*