बोरनार येथील रहिवासी श्री. निंबा बडगुजर यांचे सुपुत्र श्री. हेमंत बडगुजर सर. शालेय शिक्षण घेत असतांनाच कला क्षेत्राची आवड त्यांना होती. त्यानुसार त्यांनी आपले शैक्षणिक शिक्षण पुर्ण केले. ते ए. टी. डी., जी. डी. आर्ट आणि बी. ए. आर्ट्स मध्ये केले आहे. सरांना चित्र काढणे, बोर्ड पेंटिंग करणे, कविता लिहिणे, भाषण देणे, वेगवेगळ्या कलाकृतीचे स्केच काढणे इ. ची आधीपासूनच खुप आवड.
ते राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुर्हे (पानाचे) येथे कला शिक्षक म्हणून श्री. हेमंत बडगुजर सर कार्यरत आहेत. राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुर्हे (पानाचे) येथे दि. 26/07/2000 पासून कला शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांना कला क्षेत्रा सोबतच कविता लेखन, समाज सेवा यांची देखील आवड आहे. श्री. हेमंत सर हे विद्यार्थ्यांन मध्येच नाही तर गावातही आवडते शिक्षक आहेत. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांन सोबत सामाजिक कार्य करीत असतात. विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तक, कपडे, बुट, चप्पल वाटप करणे इ. कार्य ते नेहमी करतांना आढळतात. या कला गुणांमुळे त्यांना बर्याचश्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. काही ठळक पुरस्कार खालील प्रमाणे.



श्री. हेमंत बडगुजर सर यांना मिळालेले पुरस्कार:
- संत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार अमरावती 2015-16.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान (सासवड) समाज भूषण पुरस्कार 2016.
- कृष्ण सेवा ट्रस्ट राख ता. पुरंदर जि. पुणे 2015 – 16.
- अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवा मंडळ जळगाव यांचा माता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार 2014.
- जिजाऊमाता विश्व गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार अमरावती 2013.
- ओ. बी. सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन धुळे गुणगौरव पुरस्कार 2010.
- राजाराम शेठ बडगुजर आदर्श शिक्षक पुरस्कार 2008 कुर्हे (पानाचे) ता. भुसावळ जि. जळगाव. श्री. हेमंत बडगुजर सर यांनी लिहिलेल्या काही कविता :
- शिवजयंती
- जिजाऊंचा शिवबा हवा आहे
- राजर्षी शाहू महाराज
- निरोप समारंभ
- जो शिके शिकवी जगाला ( डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन)
- दादासाहेब एक नाव
- ग्रंथ प्रेम
- आठवण
- समाजभूषण
- उत्तम वाचक ( वाचाल तर वाचाल )
व इतर बरेच
श्री. हेमंत बडगुजर हे एक बहुरंगी व्यक्तीमत्व असून नेहमीच आपल्या समाजकल्याणाच्या कामात अग्रेसर असतात. अशा या दिलखुलास व्यक्तीमत्वास आमचा सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….. ??
शुभेच्छुक :
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
व
बडगुजर प्राउड ग्रुप

ग्रेट व्यक्तिमत्त्व!
छान उपक्रम शील व्यक्तीमत्वाची ओळख झाली