जि.प. शिक्षक श्री. विनोद प्रकाश बडगुजर यांची केंद्रप्रमुख पदी पदोन्नती- श्री. रवींद्र बडगुजर, शहादा

शहादा: जि.प. शिक्षक श्री विनोद प्रकाश बडगुजर यांची केंद्रप्रमुख पदी बढती

शहादा, नंदुरबार – फागणे, ता. जि. धुळे येथील श्री. प्रकाश पितांबर बडगुजरसौ. संगीताबाई प्रकाश बडगुजर यांचे सुपुत्र व सध्या पतंजली नगर, शहादा येथे वास्तव्यास असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री विनोद प्रकाश बडगुजर (पढ्यार) यांची गुणवत्तेच्या आधारावर बढती होऊन केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे.

शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे निष्ठेने व तळमळीने कार्यरत असलेल्या श्री विनोद बडगुजर सरांचा विद्यार्थीप्रिय व अभ्यासू शिक्षक म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रशासनाने त्यांना केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. या बढतीमुळे शहादा तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात, फागणे ग्रामस्थांमध्ये व बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

त्यांच्या या केंद्रप्रमुख पदी झालेल्या नियुक्तीबद्दल समाज बांधव, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री प्रकाश पितांबर बडगुजर परिवाराचे समाजातून विशेष कौतुक होत आहे.

बडगुजर डॉट इन परिवारातर्फे नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री विनोद प्रकाश बडगुजर सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*