चाळीसगाव | बडगुजर डॉट इन
चाळीसगावकर बडगुजर परिवाराची कन्या डॉ. निशिगंधा बडगुजर हिने MDS परीक्षेत घवघवीत यश मिळवून परिवारासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
मूळ पाचोरा येथील M.S.E.B चे लेखा अधिकारी श्री. प्रकाश रामदास पवार व जिल्हा परिषद केंद्रप्रमुख सौ. प्रतिभा प्रकाश बडगुजर यांची कन्या आणि चाळीसगावचे हेमप्रसाद यशवंत बडगुजर यांच्या पत्नी असलेल्या डॉ. निशिगंधा बडगुजर या श्री. यशवंत विठ्ठल बडगुजर व सौ. संयोगिता बडगुजर यांच्या सूनबाई आहेत.
डॉ. निशिगंधा यांनी BDS चे शिक्षण मुंबई येथील MGM Dental College, Bombay मधून पूर्ण केले. त्यानंतर CSMSS Dental College, संभाजीनगर येथून Oral & Maxillofacial Surgery या प्रतिष्ठित PG शाखेत MDS पूर्ण केले. या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले.
ओरल सर्जरी ही दंतचिकित्सा क्षेत्रातील अत्यंत आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेची शाखा मानली जाते. या शाखेतून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण
करून डॉ. निशिगंधा यांनी कुटुंबाचे व बडगुजर समाजाचे नाव मोठे केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व बडगुजर समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बडगुजर डॉट इन तर्फे डॉ. निशिगंधा बडगुजर यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐



Leave a Reply