पिंप्री खुर्द येथे कु.जयेश सुनिल बडगुजर यांचे स्वामी कुल्फी केंद्राचा शुभारंभ – श्री. तुषार मोहकर, पिंप्री

पिंप्री खुर्द येथे दिनांक १४ डिसेंबर २०२५ रविवार रोजी आपले जेष्ठ समाजबांधव कै.दामू चत्रू बडगुजर यांचा नातू आणि श्री. सुनिल दामू बडगुजर यांचा मुलगा कुमार जयेश सुनिल बडगुजर याने स्वामी कुल्फी केंद्र अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी उभारले.सदर स्वामी कुल्फी केंद्राचे उद्घाटन आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री मा.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम आपल्याला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांचे फटक्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वामी कुल्फी केंद्राचे फित कापून मा. गुलाबरावजी पाटील यांनी उद्घाटन केले. त्यानंतर स्वामी कुल्फी केंद्राचे संचालक श्री.जयेश सुनिल बडगुजर यांनी पालकमंत्री यांना व इतर उपस्थित पाहुण्यांना कुल्फी केंद्राचे उत्पादनविषयीं माहिती दिली वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या उद्योगाला सुरुवात केली हे पाहून गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले.तसेच सर्वपरी मदतीचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री गोपाल भाऊ चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व शिक्षण सभापती मा. श्री. पी.सी.आबा.पाटील तसेच पिंप्री खुर्द येथील माजी सरपंच माननीय श्री ज्ञानेश्वर बाबूलाल बडगुजर, पिंप्री खुर्द येथील पोलीस पाटील माननीय श्री.गोपाल रामदास बडगुजर, भोद येथील माजी सरपंच श्री. राजेंद्र पाटील तसेच विदयमान सरपंच तथा विजय मार्बल चे संचालक श्री. विजय पाटील, सेवा सुपर मार्ट चे संचालक श्री. संदीप पाटील, श्री. समाधान पाटील.,जळगाव येशील श्री.रोशन खुशाल पाटील, तसेच नातेवाईक मित्रमंडळी, आपटेष्ट,पिंप्री गावातील ग्रामस्थ अंजनी परिसरातील ग्रामस्थ आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन हे श्री. योगेश बडगुजर सर पिंप्री खुर्द यांनी केले. पिंप्री खुर्द यांनी केले. कु. जयेश सुनिल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹

कु. जयेश बडगुजर – 8600386406

2 Comments

  1. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  2. खूप छान एवढ्या लहान वयात उद्योग करण्यास सुरुवात केली त्या बद्दल खूप खूप अभिनंदन आपला उद्योगाची खूप प्रगती व्हावी अशी मी बाळकृष्ण कोतवाल सुरत अखिल भारतीय क्षत्रिय badgujar समाज ट्रस्ट वतीने हार्दिक शुभेच्छा पाठवतो

Leave a Reply

Your email address will not be published.


*