कसुंबा येथील श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांची एम. के. शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्राचार्य/मुख्याध्यापक पदी निवड करण्यात आली.
श्री. राजेंद्र बडगुजर हे कुसुंबा येथील प्रगतशील शेतकरी श्री. भालचंद्र व्यंकट बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. श्री. भालचंद्र बडगुजर यांना नुकताच बडगुजर दर्शन तर्फे प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर हे एम. ए. बी. एड. पर्यंत शिक्षण घेतले असून त्यांना ३२ वर्षे विद्यादानाचा प्रदिर्घ अनुभव आहे तसेच त्यांचा प्रवास शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि आता प्राचार्य/मुख्याध्यापक पदी नियुक्ती असा आहे.

नोकरी सोबतच त्यांची सामाजिक कार्यातही विशेष आवड आहे. एक निस्वार्थ सेवाभावी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण समाजात आपले एक वेगळं स्थान निर्माण करणारे एक निर्भीड व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
बडगुजर समाजाची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे मा. सचिव होते तसेच क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था धुळे ( बडगुजर समाज बोर्डींगचे) उपाध्यक्ष आहेत. तसेच कुसुंबा गावचे ग्रामपंचायत सरपंच पद सुध्दा सरांनी भुषविले आहे. विशेषतः त्या गावात आपला एवढा समाज नसतानांही त्यांनी सरपंच पद भूषवले हे समाजासाठी भुषणावह बाब आहे.
कुसुंबा येथील शिक्षक पतसंस्था चे गेल्या १० वर्षांपासून डायरेक्टर आहेत.
सरांना दोन मुले आहेत. मुलगी सौ. तेजश्री प्रशांत बडगुजर एम. बी. ए. पुणे येथे असते तर मुलगा चि. महेश राजेंद्र बडगुजर – M. Tech Food. – पुणे येथे नोकरी करीत आहे.

सरांविषयी लिहावे तितके कमीच… अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर यांची कसुंबा येथील एम. के. शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्राचार्य/मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल बडगुजर.इन यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
सुनील मधुकर करोडपती परिवार तर्फे खूप खूप अभिनंदन
अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ….