श्री. पवन गंगाराम बडगुजर यांना वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – श्री. रविंद्र दयाराम बडगुजर, शिरपुर

शिरपुर येथील ग. भा. कमलाबाई गंगाराम बडगुजर यांचे चि. श्री. पवन बडगुजर यांना दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ वार शुक्रवार रोजी पुणे येथील माणिकभाई मानवसेवा ट्रस्ट सलग्न निती आयोग भारत सरकार यांच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिरपूर येथील दै. खान्देश विशेषचे संपादक तथा शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळाचे सदस्य श्री. पवन गंगाराम बडगुजर यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला हा मानाचा सन्मान नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील. ( जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहिल्यानगर ) मा. सौ. मेधाताई विश्राम कुलकर्णी ( खासदार पुणे ) आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री. रवींद्र भोळे तसेच अदिमान्यवरांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाला. श्री. पवन गंगाराम बडगुजर यांना शिरपूर शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने, शिरपुर बडगुजर समाज मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. पवन बडगुजर – 9850785034

                

.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*