झाड :- कवी – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

झाड

वृक्षांमध्ये सर्वांसाठी परोपकारी भाव आहे
किडी मुंगी पशु पक्षांचे ते तर एक गाव आहे
कावळा असो की कोकीळ चिमणी असोवा घार
मधमाशांसह सर्वांचा तो घेतो शिरावर भार

सज्जन असो वा दुर्जन भेदभाव ना द्वेषमत्सर
सहनशिलता उदारता अन प्रेम जिव्हाळा सर्वांवर
पाने फुले फळे साल खोड मूळ फार महत्वाचे
आयुर्वेदात उपयुक्त व कार्य प्रदूषण मुक्तीचे

साधु संत महात्मासम पुजनिय हा दिनरांत
या मुक्या सजिवा वाचवू आता पुण्य पाडू पदरांत
संकल्प धरू प्रयत्नाने मग करू वृक्षारोपण
कृतज्ञतेने अन ममतेने करू यांचे संगोपन

एकदा तरी झाड व्हावे ते अर्धेभूमित अर्धे वर
झाडाचा हा त्याग पाहूनी झिजत रहावे आयुष्यभर
झाडाचे गुण पहा किती तरी अनंत हे उपकार
माणुसकीचे नाते जोडून झाडाला करू नमस्कार

कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*