विवाह:- कवी – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल

समाज कार्यकर्ते आणि गावकरी सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।।

दैवाच्याच लिला या कुणास ना कळतात
लग्न वधु-वरांचे नशिबाने जुळतात
बम्ह गाठी बांधल्या जातात देवाच्या दारी
सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।।

पुर्वजांचे म्हाणणे खरे, लग्न पहावे करून
सोयस्कर पारपाडता माणुस जातो हारून

वाढत्या महागाईला यांची गरज आहे खरी

…..सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।।
रुसवे न फुगवे धावपळ ना दगदग
ना पगंत ना वांजत्री सर्व परस्पर मग
जणू यात्रेचे स्वरुप दिसती आंनदित सारी
सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।।

सामुहिक विवाहाची धरु आता कास शुभ मंगल पार पाडू होऊ बिनधास्त नको घर – शेत विक्री नको सावकारी

सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।।

सामुहिक विवाह घेऊ जबाबदारी शासन कार्यकर्ती गावकरी
सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी

कवी – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल मो. ९६३७०७९६८८

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*