गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनीचा सत्कार बक्षीस वितरण सोहळा – श्री. प्रकाश धुडकु बडगुजर, शिक्षण समिती प्रमुख

अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती अंतर्गत अखिल भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती तर्फे व बडगुजर समाज पंचमंडळ अमळनेर यांच्या सहकार्याने सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की नेहमी प्रमाणे अखिल भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनीचा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी इयत्ता १०, १२, बी.ए, बीएससी, बीकॉम, डिप्लोमा, बी.ई. इतर सर्व उच्चं शिक्षण पदवीधर तसेच विशिष्ट प्राविण्य मिळालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी समिती पदाधिकारी सदस्य यांच्याकडे आपल्या पाल्यांचे सण २०२३-२४ चे मार्कशीट ची झेरॉक्स व त्यावर पासपोर्ट फोटो, आपला मोबाईल नंबर व पत्त्यासह प्रत्यक्ष किंवा व्हाट्सअप द्वारे दिनांक १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत खालील दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे देण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रम:- दिनांक २५ ऑगस्ट २०२४ वार रविवार सकाळी ९:३० वाजता स्थळ:- बडगुजर मंगल कार्यालय शिरूर नाका, अमळनेर जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सर्व समाज बांधव व भगिनी यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*