बडगुजर विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योती ताई परशुराम बडगुजर यांची एकमताने निवड – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

लाडक्या बहीणीची अध्यक्षपदी निवड करत बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव नी घेतला अभुतपुर्व निर्णय. सर्व समाजात आदर्श अशा निर्णयाची सर्वत्र चर्चा व कौतुक केले जात आहे. महिलांना अध्यक्ष बिनविरोध अध्यक्ष पदी नियुक्त करणारे पहिलेच समाज मंडळ ठरले जळगांव चे विद्याप्रसारक मंडळ.

दि. ०३/०८/२०२४ रोजी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव ची कार्यकारणी सदस्य सभा संपन्न झाली. विद्यमान अध्यक्ष श्री.विकास पुंडलिक बडगुजर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी कार्यकारणीने ऐतिहासिक निर्णय घेवून सर्वानुमते सौ.ज्योती परशुराम बडगुजर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आजपर्यंत कुठल्याही बडगुजर समाज मंडळांच्या अध्यक्षपदी महिलेची अध्यक्ष म्हणून निवड झाली नव्हती. बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांवच्या कार्यकारणी ने हा ऐतिहासिक निर्णय घेवून समाजातील महिला भगिनींनी साठी उच्च पदावरील दरवाजे खुले केले आहेत. महिला वर्गात हर्ष उल्हासाचे वातावरण आहे. अतिशय स्पष्ट वक्त्या, म्रुदुभाषी, मानसन्मान ठेवून बोलणाऱ्या सौ.ज्योती ताई या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवित असतात. त्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती च्या कार्यकारीणी सदस्या सुध्दा आहेत. त्यांची बडगुजर समाज विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे बडगुजर.इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे ही खूप खूप आभार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*