आदित्य बडगुजर याने NEET परिक्षेत ९७.३३ पर्सेंटाईल गुण पटकावले: -सार्थक साळुंखे,धुळे

🤷‍♂️शैक्षणिक यश🤷‍♂️

धुळे: येथील श्री.मनीष प्रभाकर बडगुजर व सौ.अरवीना मनीष बडगुजर यांचा मुलगा तथा बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील (बीडगाव-चोपडा)व श्री.प्रभाकर दयाराम बडगुजर (तोरखेडा-डेडियापाडा)यांचा नातू आदित्य हा नुकताच जाहीर झालेल्या NEET-2023 परिक्षेत 563/720 (97.33 percentile)गुण संपादन करत ऑल इंडिया लेव्हलवर 54073 रॅंक पटकावली,हे विशेष!
आदित्य हा लहानपणापासूनच चाणाक्ष व हुशार असून-शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आई वडिलांची प्रेरणा घेत शैक्षणिक वाटचाल करत असून,त्याचा येथून पुढे वैद्यकीय शाखेत नशिब आजमावण्याचा मानस आहे.
आदित्यच्या यशाने धुळे, चोपडा,तोरखेडा बडगुजर परिवार व समाजात उत्साहाचे वातावरण असून आदित्यचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज शिक्षण व युवा समिती,बडगुजर समाज मंडळ-चोपडा,धुळे व तोरखेडा तर्फे आदित्य चे अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा 💐💐
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*