नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाचा ऑनलाईन निबंध स्पर्धा निकाल जाहीर
विजयी स्पर्धकांना वाफ घेण्याचे मशिन (वेपोरायझर), सॅनिटायझर बॉटल, पाच मास्कचे वाटप – श्री. देविदास बडगुजर, नंदुरबार
नंदुरबार-येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे नुकतेच ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण बडगुजर समाजात पहिल्यांदाच नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाने ऑनलाईन मीटिंग घेऊन निबंध स्पर्धा जाहीर केली व ती यशस्वीपणे पार पडून विजेत्या स्पर्धकांना आज बक्षीस जाहीर झाले आहे. नंदुरबार मंडळाने लॉकडाउन काळातही आपल्या कार्यक्रमांना कुठलाही खंड न पडता आपण कशा पद्धतीने कार्यक्रम घेऊ शकतो हे सर्वांसमोर सिद्ध केले आहे.
या निबंध स्पर्धेत बडगुजर समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाज बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. यात खुला गटात सौ.कविता प्रकाश बडगुजर, मोठ्या गटात कु.वैष्णवी प्रवीण बडगुजर तर लहान गटात कु.सानिका अनिल बडगुजर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकाविले. विजयी सर्व स्पर्धकांना वाफ घेण्याचे मशिन (वेपोरायझर), सॅनिटायझर बॉटल, पाच मास्क तसेच रोख स्वरुपात रक्कम तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
सद्या जगासह भारत देशात कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, सोशल डिस्टन्स सारखे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम-कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. या कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे बडगुजर समाज उन्नती मंडळाचा यावर्षी होणारा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. परंतु मंडळामार्फत समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाज बांधवांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेसाठी लहान गट (इयत्ता ५ ते ८ वी), मोठा गट (इयत्ता ९ ते १२ वी) तसेच खुला गट (इयत्ता १२ वी पुढील सर्वांसाठी) असे तीन गट पाडण्यात आले होते. लहान गटासाठी ‘लॉकडॉऊनमधील सकारात्मक बदल’ (शब्द मर्यादा किमान ३००), मोठ्या गटासाठी ‘कोरोना नियंत्रण आणि नागरीकांची भुमिका’ (शब्द मर्यादा किमान ५००) तर खुल्या गटासाठी ‘ऑनलाईन शिक्षण काळाची गरज?’ (शब्द मर्यादा किमान ७००) असे विषय देण्यात आले होते. या ऑनलाईन निबंध स्पर्धेत खुला गटात सौ.कविता प्रकाश बडगुजर (प्रथम), कु.रुपाली राजेंद्र सुर्यवंशी (द्वितीय), चि.मयुर भटू बडगुजर (तृतीय), तर चि.मयुर मनोज बडगुजर (उत्तेजनार्थ), मोठ्या गटात कु.वैष्णवी प्रवीण बडगुजर (प्रथम), चि.राज विजय बडगुजर (द्वितीय), चि.खुशाल अश्विन बडगुजर (तृतीय), कु.मोक्षदा शरद बडगुजर (उत्तेजनार्थ), तर लहान गटात कु.सानिका अनिल बडगुजर (प्रथम), चि.यश दिलीप बडगुजर (द्वितीय), चि.कुणाल पंकज बडगुजर (तृतीय), कु.समृद्धी नितीन बडगुजर, चि.मंथन देविदास बडगुजर (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले. विजयी एक ते तीन स्पर्धकांना वाफ घेण्याचे मशिन (वेपोरायझर), सॅनिटायझर बॉटल, पाच मास्क, प्रमाणपत्र तसेच प्रथम ३०१, द्वितीय २०१, तर तृतीय स्पर्धकास १०१ रुपये रोख स्वरुपात रक्कम देवून गौरविण्यात येणार आहे. सदर बक्षिसाचे प्रायोजक मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय संतोष बडगुजर हे आहेत. परिक्षक म्हणून शिक्षक घनश्याम बडगुजर व एस.बी.सोनार सर यांनी काम पाहिले. बक्षिसाचा सर्व आर्थिक खर्च मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर यांनी केला. तर स्पर्धेसाठी दिलीप बडगुजर आणि संदीप बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मंडळाचे रवींद्र बडगुजर अश्विन बडगुजर देविदास बडगुजर दिनेश बडगुजर भाईदास बडगुजर पंडित बडगुजर विलास बडगुजर विजयकुमार बडगुजर प्रकाश बडगुजर गणेश कोतवाल यांचेही सहकार्य लाभले. लवकरच विजयी स्पर्धकांना पारितोषीक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply