कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८१% – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८१% टक्के लागला असुन मागील वर्षी च्या तुलनेत ३० टक्के उसळी घेतली आहे. शाळेतील एकूण ३९ विद्यार्थ्यांनी ८०% टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. यात तेजल संजय बारी या विद्यार्थीनीने ९४.६० % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विवेक विष्णू काटोले ९२.४०%, तृतीय क्रमांक प्रांजल गोपाल बारी ९२.००%, दिवेश शशिकांत शिंदे ९१.२०%, तेजस प्रमोद कापसे, ९०.४०% जानवी वासुदेव गांधेले ९०% टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ बडगुजर, सचिव प्रमोद छाजेड, मुख्याध्यापक डी डी पाटील , सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*

??????

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*