कोविड १९ कोरोना योद्धा सत्कार – डॉ. पुजा मनोज बडगुजर, पनवेल – कोरोनाच्या युध्दात कोरोनावर मात करून परत रणांगणात लढवायस सज्ज – श्री. महेंद्र उत्तमराव बडगुजर, धुळे

डॉ.पुजा मनोज बडगुजर या धुळे येथील उत्तमराव हेमलाल बडगुजर यांची नात आहे तर पनवेल स्थित बडगुजर समाजातील नामवंत उद्योजक डॉ. मनोज बडगुजर यांच्या सुकन्या आहेत. ते मुळचे धुळे येथील रहीवासी असून कामानिमित्त पनवेल येथे वास्तव्यास आहेत.

कोरोना आल्यापासून त्यांची ड्युटी अमरावती येथील पी. डी. एम. सी. कोविड सेंटर मध्ये लागली आहे. परिवारापासून लांब आणि त्यात कोरोना कोविड सेंटर मध्ये नोकरी. यामुळे घरच्या लोकांना काळजी जरा जास्तच वाटते. पण डॉ. पुजा यांनी ठाम राहून तसेच आई वडिलांनी दिलेल्या आत्मविश्वास यामुळे त्या रूग्णांना तत्पर सेवा देत आहेत.

त्यात आपल्या आजोबांची तब्येत खराब झाल्याचा संदेश आला त्यांचे वय जास्त असल्या कारणाने सेवेत रूजू होण्यापूर्वी आजोबांची भेट घेतली होती. आजोबांची लाडकी नात त्यांना तिचे कौतुक करावे तितके कमीच. तिच्या हिमतीला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि शुभाशिर्वाद दिला की तु या कामात नक्कीच यश मिळवशील.

डॉ. पुजा यांना पी. डी. एम. सी. हाॅस्पिटल मध्ये रूग्णांची सेवा करता करता कोविड ची लागण झाली. सौम्य लक्षणे होती. म्हणून जवळच्या कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले. कोविड मुळे घरच्या लोकांची काळजी अधिक जास्त प्रमाणात वाढत होती. पण या परिस्थितीत आई वडिलांनी डॉ.पुजाला आपल्या मुलीला धीर दिला. आपली मुलगी ही लढवय्या आहे आणि तिने याआधीही वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढले आहे. यातूनही मार्ग निघेल. थोडी हिंमत ठेव असे आई वडिलांचे शब्द ऐकून डॉ. पुजा सकारात्मक राहत असत. आणि याच सकारत्मकते मुळे त्यांनी लवकरच कोरोनावर मात केली. डॉ. पुजा हिस काका श्री. महेंद्र बडगुजर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

कोरोनाशी लढत असतांना आजोबा गेल्याचे समजले. आजोबांशी एक वेगळेच नाते होते त्यामुळे अश्रुधारा रोखणे कठीण आणि शेवटच्या क्षणी भेटायला जाणे सुध्दा शक्य नाही. पण आजोबांनी दिलेल्या शिक्षणाची आणि आशिर्वादाची आठवण करत त्यावर ठाम पणे आपले कर्तव्य बजावून खऱ्या अर्थाने त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्याचे ठरेल असे मनापासून ठरविले.

डॉ. पुजा आता ह्या पुर्णपणे बऱ्या झाल्याअसून परत आरोग्य सेवेत रूजू झाल्या आहेत. नुकताच त्यांचा अमरावती चे जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम दक्ष कोविड १९ कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. तसेच आम्ही अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त वेब पोर्टल टिम तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि आम्हास अभिमान आहे की आपण आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य दक्षतेने ही लढाई लढत आहात. आपल्या आरोग्य सेवेस आमुचा सलाम.

त्यांनी कोरोनावर कशी मात केली व काय अडचणी आल्यात ते त्यांनी आपल्या व्हिडीओ मध्ये शेअर केल्या आहेत.तर समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी हा व्हिडीओ सर्वांनी अवश्य पहावा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*