जळगांवः येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामदास बंडू बडगुजर यांचे व्दितीय पुत्र व प्रा.संजय बडगुजर,संचालक स्वर साधना संगीत विद्यालय,आदर्शनगर, जळगाव यांचे बंधू प्रा.डॉ. नितीन बडगुजर यांनी २०१७ मध्ये “महाराष्ट्र शासन अंगीकृत जलस्वराज्य प्रकल्पाचे ग्रामीण विकासातील सहभागाचे अध्ययन- जळगांव जिल्हा” या विषयावर शोध प्रबंध कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव ला सन २०१७ मध्ये सादर करून डाॕक्टरेट पीएच्.डी. पदवीग्रहण केलेनंतर आपल्या पदवीचा भावी संशोधक विद्यार्थी,समाज तथा शासनास विविधोपयोगी होण्याचे उद्देशाने जागतिक बँकेने अर्थसहाय्य केलेल्या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील जनतेला ‘शुध्द पाणी-स्वच्छ गांव’ होण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्ह्यातील १०० गावात अभिनव प्रकल्प राबविण्यात आला. अश्याप्रकारे संशोधनात्मक नमुना निवड पध्दत तथा माध्यमातून २० गावातील ६१४ निवेदकांकडून क्षमता विकास,महिलाविकास, जल समस्या,अस्वच्छता, लोकसहभाग,प्रशासकीय भूमिका,स्वयंसेवी संस्थांची भूमिका, शालेय विकास, ग्रामपंचायत बळकटीकरण, व्यावहारिक पारदर्शकता, पारंपारिक सवयीतील बदल इत्यादी पैलूंवर सखोल माहिती संकलित करून त्याआधारे निघालेल्या निष्कर्षांची शास्रीयदृष्ट्या मांडणी करत “ग्रामीण विकासाचे तंत्र : जलस्वराज्य प्रकल्प” नामक पुस्तक लिहून “अथर्व प्रकाशन,जळगाव” मार्फत जुलै-२०१९ मध्ये दिमाखात प्रकाशन केले.

प्रथम पुस्तक प्रकाशनानंतर शांत न बसता प्रा. डॉ. नितीन बडगुजर, यांनी लोक सहभाग या संकल्पनेवर विचार करत लोक सहभागाची गरज, महत्व, तत्वे तथा तत्वज्ञान, प्रक्रिया, प्रशिक्षण विविध माॕडेल्स व त्याची व्याप्तींवर लोकसहभागासाठीची आवश्यक तंत्रे,कौशल्ये,साधने, नवनवीन पध्दती,बदलते आयाम,ततसंबंधीची पात्रता, निकष,विविध प्रक्षेत्रिय प्रकल्पीय यशोगाथा आश्या नानाबाबींचा विचार करुन त्याची मुद्देनिहाय मांडणी करून (सहभागीय दृष्टीकोन व समाज कार्य)-इंग्रजी माध्यमात “Participatory Approaches in Social Work नामक दुसरे पुस्तक लिहून “Current Publication, Agra (‘करंट पब्लीकेशन, आग्रा’) यांचे माध्यमाने गत फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकाशित करुन लवकरच मराठी माध्यमात प्रकाशित करणेचा मानस आहे.
बडगुजर समाज बंधू भगिनी, नातेवाईक, आप्तेष्ठ, मित्रमंडळी व कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि जळगांवचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांकडून डाॕ.नितीन वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप व वेब पोर्टल टीम तर्फे डॉ.नितीन बडगुजर,यांचे अभिनंदन व भविष्यात समाजोपयोगी लिखाणासांठी शुभेच्छा.?????????


अभिनंदन !
व्वा!डाॕक्टर पढ्यार कुळाचा उध्दार करत आहेस! तुझं कौतुक करावं तेव्हढं कमीच होईल.Keep it up,al the best.