☕☕☕☕☕☕☕
???????
?आदर्श जीवनाचा चहा ?
जीवनरुपी रिकाम्या भांड्यात
स्नेहाचे पाणी घाला त्यात
घेऊ या आपण सारे
आदर्श जीवनाचा चहा।।
मायेची अन आदर्श वागणूकीची
टाका चहा पावडर
दयेचे वेलदोडे अन सुंठपावडर
मधूर वाणीची साखर घाला त्यात
घेऊ या आपण सारे
आदर्श जीवनाचा चहा।।
स्वच्छ शुद्ध मनाच्या
गाळणीतून गाळा चहा
काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर
गाळ काढा बाजूला
प्रमाचे दुध घाला त्यात
घेऊ या आपण सारे
आदर्श जीवनाचा चहा।।
आदर्शरुपी किटलीतून
नम्रतेच्या कपातून
सौजन्यतेच्या बशीतून
शांतीची फुंकर घाला त्यात
घेऊ या आपण सारे
आदर्श जीवनाचा चहा।।
अशा चहाची गोडी लावा जरा
सुख, शांती, आनंद येईल खरा
जीवनातील थकवा नाहीसा करा
सुख, समाधान, उत्साहाची
कारंजी उडेल घरा घरा
घेऊ या आपण सारे
आदर्श जीवनाचा चहा।।
कवयित्री –
श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर
म. रा. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Leave a Reply