श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ तर्फे शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यीनींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत कु. दर्शना संजय कोतवाल हिस प्रथम पारितोषिक मिळाले. कु. दर्शनाला एक हुशार विद्यार्थिनी असून तिला कला क्षेत्रात अधिक रस आहे. कु. दर्शना ही कुर्हे पानाचे येथील माजी सरपंच स्व. शिवदास किसन कोतवाल यांची नात आहे. कु. दर्शनाचे वडील श्री. संजय शिवदास कोतवाल हे गावातील प्रगतशील शेतकरी आहेत.
तिला मिळालेल्या यशाबद्दल शिक्षकांनी, नातेवाईक व पालकांनी कौतुक केले. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कु.दर्शनाचे खुप खुप अभिनंदन !
व यापुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !