बहुतांश वेळां दहावी, बारावीनंतर कॉमर्स शाखा निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉमर्समधील संधी बाबत योग्य ती माहिती नसते. कोणतेही क्षेत्र निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, व उत्तम करिअर कसे करायचे याबाबत आपण जाणून घेऊ ….
कॉमर्सची गरज कां व कुठे?: अकाउंटिंग, टॅक्सेशन, प्रशासन, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, इन्शुरन्स, डिफेन्स, स्टॉक मार्केट, बँकिंग, फायनान्स, लॉ, टॅक्स कान्सल्टिंग, इंटरनॅशनल बिझनेस, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, मल्टीमीडिया, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत कॉमर्स पदवीधारकांना संधी असते.
आवश्यक गोष्टी:
▪मातृभाषेसोबत इंग्रजी आणि इतर भाषेवर प्रभुत्व हवे
▪मेहनत आणि ग्लोबल अवेअरनेस असणे आवश्यक
▪अवांतर वाचन करून जास्तीत जास्त ज्ञानात भर पाडणे
▪सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेणे
या क्षेत्रात अनेक संधी असून, ज्ञान आणि अनुभावरून या क्षेत्रातील पगार ठरतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आयत्या नोट्सवर अवलंबून न राहता रेफरन्स बुक्स आणि अवांतर वाचन या वरून अभ्यास करावा. तसेच दररोज किमान दोन वृत्तपत्रे आणि महिन्यातून एकदा एक तरी मासिक वाचावे.
? करिअरसाठी पदवीसोबत पदव्युत्तर कोर्स केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

Leave a Reply