पिंपळगाव हरेश्वर येथील “ग्राम विकास मंडळाच्या संचालक पदी श्री. प्रदीप दादा बडगुजर व श्रीमती लताताई बडगुजर यांची निवड

पिंपळगाव हरेश्वर येथील “ग्राम विकास मंडळाची” सार्वत्रिक
निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये आपल्या
बडगुजर समाजातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. प्रदीप रघुनाथशेठ बडगुजर व श्रीमती लताताई किशोरशेठ बडगुजर हे भरघोस मतांनी विजयी झाले व त्यांची संस्थेच्या मंडळावर संचालक पदी वर्णी लागली आहे. “ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव हरेश्वर” संचलित “ग्राम विकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालय” येथे ७००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकच वेळी 2 समाज बंधावाचे संचालक मंडळावर निवडून येणे हे आपल्या समाजासाठी गौरवास्पद बाब आहे. बडगुजर समाजाचा झेंडा असाच उंच उंच फडकत राहो हीच प्रार्थना. निवडणुकीत पिंपळगाव हरेश्वर येथील बडगुजर समाज बांधवांचे अनमोल सहकार्य लाभले असे निवडून आलेल्या उमेदवारांनी सांगितले व त्यांचे आभार मानले. निवडून आलेल्या समाजबांधवांचे बडगुजर. इन टिम तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*