साप्ताहिक मराठी पत्रकार संघ नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची बिनविरोध निवड

​नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आपल्या निर्भीड लेखणीने ठसा उमटवणारे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. दिलीप राघो बडगुजर यांची साप्ताहिक मराठी पत्रकार संघ, नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता वर्तुळात तसेच सामाजिक स्तरातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अष्टपैलू नेतृत्व आणि कार्याचा गौरव :

​दिलीप बडगुजर हे केवळ पत्रकारच नव्हे, तर एक कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. ते सध्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय नंदुरबार पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक, अ.भा.ब.स. युवा समितीचे माजी अध्यक्ष आणि बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबारचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

​’साप्ताहिक युवा गर्जना’च्या माध्यमातून सामाजिक जनजागृती :

​ते साप्ताहिक ‘युवा गर्जना’चे संपादक असून, हे साप्ताहिक नंदनगरीत एक निर्भीड आणि दिशादर्शक वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध आहे. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे आणि समाजहिताचे विषय मांडण्याचे काम त्यांनी या साप्ताहिकाच्या माध्यमातून प्रभावीपणे केले आहे. विशेषतः बडगुजर समाजात या साप्ताहिकाने आपली एक स्वतंत्र आणि अनोखी ओळख निर्माण केली आहे.

बिनविरोध निवडीची परंपरा कायम :

​दिलीप भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आतापर्यंत ज्या-ज्या पदावर निवड झाली आहे, ती सर्व पदे त्यांनी बिनविरोध भूषविली आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांना कधीही विरोधाचा सामना करावा लागला नाही, हीच परंपरा पत्रकार संघाच्या निवडीतही पाहायला मिळाली.


​तरुणांचे मार्गदर्शक आणि समाजोपयोगी उपक्रम :
​त्यांनी युवा अध्यक्ष म्हणून काम करताना तरुणांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यात प्रामुख्याने:
​स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर कौन्सिलिंग.
​इंटरव्ह्यू स्किल्स आणि व्यक्तिमत्व विकास (Personality Development) कार्यशाळा.
​नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे.
​रक्तदान शिबिरे व आरोग्य सेवा.
​यांसारख्या उपक्रमांमुळे ते तरुणांचे प्रेरणास्थान बनले आहेत. समाज त्यांना ‘नवीन दिशादर्शक’ व आणि समाज नेतृत्व म्हणून पाहत आहे.

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव :
​या निवडीबद्दल बडगुजर.इन टिम आणि बडगुजर प्राऊड फाउंडेशन यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*