बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे आयोजित बडगुजर समाज स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2025 थाटामाटात संपन्न

दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी बालाजी लॉन्स जुनी सांगवी पुणे येथे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे तर्फे पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व समाज बांधव यांच्यासाठी स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळावा मध्ये परिसरातील बहुसंख्य समाज बांधवांनी सहभाग घेतला. सदरील कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहराचे लाडके आमदार माननीय श्री शंकर शेठ जगताप हे आवर्जून उपस्थित होते.

मा. आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांना निवेदन देतांना

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. अनिल गणपत बडगुजर हे होते, प्रमुख मान्यवर सौ. सारिका ताई महेंद्र पवार – महिला अध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड, श्री. राजेंद्र छगनलाल बडगुजर – उद्योजक, श्री. अमोल सुभाष बडगुजर – उद्योजक, श्री‌. सागर अरविंद शुक्ल – उद्योजक, डॉ. आकाश रवींद्र बडगुजर, डॉ. सचिन रघुवंशी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ३० गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व तसेच डॉ. आकाश रविंद्र बडगुजर व डॉ. सचिन शंकरराव रघुवंशी यांनी वैद्यकीय क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे मदत किंवा मार्गदर्शन लागल्यास सदैव मदत करतील असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रयशेठ बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व भविष्यातील मंडळाचे नियोजन याविषयी माहिती दिली. त्यापैकी एक म्हणजे बडगुजर समाजाला जागा मिळवून देण्यासाठी यथायोग्य प्रयत्न, पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील बडगुजर समाज बांधवांची समाज बांधवांची समाज पुस्तिका तयार करणार असे आश्वासन दिले.

सौ. सारिका ताई पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना महिला सशक्तिकरण, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व बडगुजर समाजाला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील व आमदारांनाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहराचे लाडके आमदार माननीय शेठ जगताप यांनी आवर्जून उपस्थिती दिली. त्यांच्या हस्ते बडगुजर समाचार अंक २०२५ चे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी यावेळी समाज बांधवांना संबोधित केले. त्यांनी समाजाला कुठल्या प्रकारची मदत किंवा सहकार्य लागल्यास ते नक्कीच करतील तसेच बडगुजर समाजासाठी वस्तीगृहासाठी योग्य जागा मिळवून देण्यास नक्कीच प्रयत्न करतील असे यावेळी आश्वासन दिले.

माननीय आमदार श्री. शंकरशेठ जगताप समाजबांधवांना संबोधित करतांना

तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा हा खेळ महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या उत्सुर्त प्रतिसाद आणि खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम रंगला.

या खेळातील विजेत्या स्पर्धकास पैठणीचे प्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, ज्यांचं प्रायोजन टिव्ही वरील होम मिनिस्टर या कार्यक्रमाला दिले होते. त्यांच्या तर्फे प्रमुख मान्यवर सौ. सारिका ताई महेंद्र पवार व विजेत्या स्पर्धकास मानाची पैठणी देण्यात आली.

अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये प्रथम विजेत्या सौ. वृषाली अमोल बडगुजर यांना स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठेकर रोड, पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेली पैठणी प्रथम पारितोषिक म्हणून देण्यात आली. द्वितीय सौ वर्षा प्रकाश चव्हाण यांना चांदीचा कुंकवाचा करंडा, तृतीय सौ. चैत्राली राकेश बडगुजर यांना चांदीची निरंजनी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप त्र्यंबक शेठ बडगुजर, श्री लोकेश कोतवाल, सुत्रसंचलाक श्री राकेश बडगुजर व श्री महेंद्र पवार यांनी चांगली साथ दिली. सौ दिपाली परब यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याचे सूत्रसंचालन केले.

यावेळी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे अध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, उपाध्यक्ष श्री राजेंद्र वसंत बडगुजर, सचिव सौ. कीर्तीताई महेंद्र बडगुजर, संघटक श्री कैलास शेठ बडगुजर, श्री रतिलाल शेठ बडगुजर, श्री अनिल शेठ बडगुजर श्री प्रशांत बडगुजर,श्री. महेंद्र पवार, श्री राकेश बडगुजर, सौ संगीता ताई बडगुजर, सौ. राजश्रीताई बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल तसेच मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री प्रदीप त्र्यंबक बडगुजर, श्री. मुकेश बडगुजर, श्री. प्रदीप राजाराम बडगुजर, श्री. सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भालचंद्र बडगुजर आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

बडगुजर समाचार अंकाचे प्रकाशन करतांना मा. आमदार श्री. शंकरशेठ जगताप व मान्यवर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*