आत्मपरिक्षण
माणसा माणसा बघ हे पाखर शिकण्यासारखं आहे खरं त्यांना आहे दूर दृष्टी त्यांनीच केली सुंदर सृष्टी
पशु पक्ष्यांचे मधुर गुंजन सदैव करती मानवाचे रंजन घ्या ध्यानी मुंगीची आठवण स्वतःसाठी करी अन्न साठवण
सुंदर घर बनविते सुग्रण स्तुती गर्व ना कुणा जाग्रण बेताचाच घेती ते आहार कसलाही नसे त्यांना आजार
गोड फळे शुध्द हवा निसर्गाची नसे भिती त्यांना वायू प्रदूषणाची वेळ, काळ, पथ्य मैथुनाचे भान जणू आजच्या माणसास हे आवाहन
शिस्त नम्र आनंदी व स्वतंत्र दीन, कोमल, प्रेमळ व निस्वार्थ निर्दयी माणसांची वाटते त्यांना भिती म्हणून जोडतात ते निसर्गाशी दोस्ती
युक्तीवान पशुपक्ष्यांपासून घ्या शिक्षण शक्तिवान माणसांनो करा आत्मपरिक्षण
कवी, श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल – 96370 79688



Leave a Reply