बोलका निसर्ग – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

बोलका निसर्ग

माणूसकी झाली महाग, म्हणून निसर्गात मी गेलो
उपदेश आणि अनुभव घेऊन माघारी आलो
पायात पायतण घालून, मी वाट धरली आपली
जमीन म्हणाली हसून, बघ मी किती तापली

मग अनवाणीच चाललो पाय पडला काट्याला
फांग म्हणाली हसून का आला माझ्या वाट्याला

पुढे चिंचा झाडाला पाहून तोंडाला आले पाणी
फांदी म्हणाली चिंचाच घ्या मला मोडू नका कुणी

पुढे ताज्या फुलांच्या बागेत मन गेले मोहून
काटे म्हणाले सावधान, फक्त गुलाब घ्या पाहून

चालतांना दगडाची ठेच लागून मी पडलो
दगड म्हणाले तुमचीच कृपा म्हणून आम्ही घडलो

खुप फिरलो अन थकलो घसा कोरडा झाला
पाणी हेच जीवन आहे हसून म्हणाला नाला
आमराईत विसावलो थोडा वर कैरी दिसली छोटी
शेजारी वेलाली लागली कलीगंडे का मोठी ?

हा विचार करतांनाच ती कैरी डोक्यावर पडली
निसर्गाची योजना पाहून अद्दल मला घडली

बरेच काही निसर्गात हे सर्वच परोपकारी

सहनशीलता यांची पाहन बोध घेऊ सारी

निसर्गातील फेर फटका हा नयनी आलो भरून
मीपणाचा अहंकार तो क्षणांत गेला विरून

कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*