धुळे – अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या *वार्षिक सर्वसाधारण सभेचे १५ सप्टेंबर २०२४ रोजी मातोश्री मंगल कार्यालय, पिंपळगाव(हरेश्वर) येथे सकाळी १० वाजता* महासमितीचे अध्यक्ष श्री सुरेश शिवराम महाले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली असून *आजीवन सभासदांनी* उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री सुरेश महाले व सचिव प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर यांनी केले आहे.
सर्व आजीवन सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा पोस्टाने पाठविण्यात आले आहेत.
सभेचे विषय येणेप्रमाणे आहेत –
१. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे.
२. सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षाचा जमाखर्च व लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देणे.
३. सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षाच्या कार्य अहवालास मंजुरी देणे.
४. सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजुरी देणे.
५. न्यासाच्या नवीन आजीवन वाढीव सभासदांना मंजुरी देणे.
६. “आजीवन सभासद नोंदणी मोहीम” राबविण्याबाबत निर्णय घेणे.
७. “बडगुजर दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा” घेणेबाबत मंजुरी देणे.
८. मा. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे.
आयत्या वेळेच्या विषयाबाबत दि. १२/०९/२०२४ पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात आलेल्या विषयांचा चर्चेसाठी समावेश केला जाईल. तरी महासमितीच्या आजीवन सभासदांनी उपस्थिती देऊन समाज संघटन व समाज विकासाच्या पर्वात आपला सहभाग अधोरेखित करण्याचे आवाहन सचिवांनी ( मो. न. 7972924099)केले आहे.
Leave a Reply