धरणगाव येथील श्री. विनोद श्रीराम मोहकर यांची नुकतीच बडगुजर समाज युवा समिती संघटक पदी निवड करण्यात आली. श्री. विनोद भाऊ अतिशय शांतप्रिय, संयमी व कुशल संघटक आहेत. ते महावितरण मध्ये क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात, तन मन आणि धनाने सहकार्य करीत असतात. तसेच ते बडगुजर.इन या समाज वेबसाईट चे सहसंपादक सुध्दा आहेत.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समिती तर्फे युवा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात विनोद भाऊ वरती युवा संघटनाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Leave a Reply