
पुणे (प्रतिनिधी) पलूस (ता. सांगली) येथील अक्षय दिनेश बडगुजर हा उच्च शिक्षणासाठी नुकताच अमेरिकेला रवाना झाला अाहे. त्या ठिकाणी चांगले शिक्षण घेऊन उज्जवल करिअर करण्याचा मानस त्याने व्यक्त केला अाहे.
अक्षय बडगुजर हा वर्षी (ता.शिंदखेडा, जि. धुळे) येथील मूळ रहिवासी व नाेकरीनिमित्त पलूस (जि.सांगली) येथे स्थायिक झालेले लक्ष्मणराव किर्लाेस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज येथील शिक्षक दिनेश मच्छिंद्र बडगुजर व साै. सुनीता दिनेश बडगुजर यांचा मुलगा अाहे. त्यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे सर्व शिक्षण लक्ष्मणराव किर्लाेस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज या ठिकाणी झाले आहे. पुण्यातील नांमाकित काॅलेजमध्ये त्याने बीई मॅकेनिकल हे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात शिकताना त्याने इकाे टाेकरी या कंपनीत काम करुन ती वाढविण्यात फार माेलाचे कार्य केले अाहे. लहानपणापासून हुशार, नवीन शिकण्याची व अाव्हाने पेलून ते पूर्ण करणाऱ्या जिद्दी अक्षयने उच्च शिक्षण विदेशात घेण्याचा चंग बांधला हाेता. त्यानुसार ताे अापले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील करत हाेता. अखेर त्याच्या प्रयत्नाना यश आले आणि त्याला अमेरिकेतील डॅलस येथील टेक्सास विद्यापीठात Business analytics data science cohort (व्यवसाय विश्लेषण डेटा विज्ञान समूह) यासाठी प्रवेश मिळाला अाहे. या ठिकाणी ताे दाेन वर्ष त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करणार अाहे. अक्षयची बहिण याेगेश्वरी राकेश बडगुजर हिने देखील पलूस येथे उच्च शिक्षण पूर्ण केले असून ती लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अाहे. तिचे पती व अक्षयचे पाहुणे राकेश विलास बडगुजर (शिरपूर) हे देखील अमेरिकेत चांगल्या नांमाकित कंपनीत नाेकरीला अाहे. अक्षय पुण्यात शिकत असताना त्याच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नाला अाकार येणाऱ्यासाठी त्याचे काका पुण्यातील जेली टाऊन कंपनीचे मालक उद्याेजक शैलश भरत बडगुजर (वर्षी) यांनी देखील माेलाची साथ देऊन याेग्य मार्गदर्शन केले. या शिवाय अमेरिकेतील काॅम्प्युटर इंजिनिअर किरण श्रीराम बडगुजर (अलाेरे) यांचे देखील त्याला माेलाचे मार्गदर्शन लाभले अाहे. तसेच शिरपूर येथील अाजी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलबाई मच्छिंद्र बडगुजर, काका सतीश मच्छिंद्र बडगुजर, सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले नंदकिशाेर मच्छिंद्र बडगुजर व मामा अनिल एकनाथ बडगुजर (दुबई), महेश एकनाथ बडगुजर (पिंपळकाेठा), लिलाधर एकनाथ बडगुजर (छत्रपती संभाजीनगर), बहिणीचे सासरे विलास दंगल बडगुजर (शिरपूर) व इतर नातेवाईक यांचे देखील वेळाेवेळी मार्गदर्शन लाभले आहे. चि. अक्षय बडगुजर यांस उच्च शिक्षणासाठी बडगुजर. इन टिमकडून हार्दिक शुभेच्छा

Wish you all the best Akshay
Congratulations to Akshay & Parents Go Ahead God Bless you 🌹🌷🌺👌👍