महाराष्ट्र होमिओपॅथी फिमेल डॉक्टर असोसिएशनच्या (एम.एच.एफ.डी.ए.) शिरपूर शाखेचा स्थापना दिन समारंभ २३ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे – श्री. रविंद्र बडगुजर, शिरपुर

शिरपूर- महाराष्ट्र होमिओपॅथी फिमेल डॉक्टर
असोसिएशनच्या (एम.एच.एफ.डी.ए.) शिरपूर शाखेचा स्थापना दिन समारंभ रविवारी २३ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
एम.एच.एफ.डी.ए. ही महिला होमिओपॅथिक
डॉक्टर्सची संघटना आहे. मुंबई येथील होमिओपॅथी डॉक्टर रूपाली गोसावी या संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात या संघटनेचे सुमारे १० हजार सदस्य आहेत. या संस्थेच्या स्थापना दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम दादा पावरा, एम.एच.एफ.डी.ए. संस्थापक अध्यक्ष डॉ. रूपाली गोसावी मुंबई, सचिव डॉ. आरती नल मुंबई, कोर कमिटीच्या डॉ. कोमल विग, स्टेट लेवल कमिटी मेंवर तसेच शिरपूर डीवायएसपी भागवत सोनवणे, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, शिरपूर पीएसआय छाया पाटील, धुळे महापौर प्रतिभाताई चौधरी, शिरपूरच्या माजी नगराध्यक्ष सौ. संगीताताई देवरे, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेल धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल बडगुजर, किसान ज्ञानोदय मंडळ गुढे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चेअरमन डॉ. अमृताताई महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वृषाली बडगुजर, उपाध्यक्ष डॉ. योगिता देवरे, उपाध्यक्ष डॉ. शुभांगी एंडाईत, सचिव डॉ. जयलक्ष्मी गिरासे, कमिटी मेंबर डॉ. मिरा जाधव, डॉ. धारीनी जैन, डॉ. आएशा मलिक, डॉ. आएशा पटेल हे पदभार स्वीकारणार आहेत. शिरपूर शहरातील हॉटेल उत्सव सिटी प्राईड मॉल अँड मल्टिप्लेक्स, करवंद नाका येथे शिरपूर, धुळे परिसरातील सर्व महिला डॉक्टर्स यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3 Comments

  1. शिरपूर येथे 23 जून रोजी आयोजित होमिओपॅथिक असोसिएशनचा कार्यक्रमाची बातमी सुखद धक्का देऊन गेली, धुळे जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अतुल बडगुजर यांचे देखील खूप खूप अभिनंदन आणि शिरपूर होमिओपॅथिक डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वृषाली बडगुजर यांचे देखील खूप खूप अभिनंदन समाजाच्या प्रगतीमध्ये यांनी मानाचा तुरा रोडला त्याबद्दल मी वैयक्तिक सुनील बडगुजर करोडपती उल्हासनगर आणि समस्त मुंबई विभाग बडगुजर समाजातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो

Leave a Reply

Your email address will not be published.


*