पोलिस दलात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे, हळव्या मनाचे आणि वेळप्रसंगी कठोर भूमिकाही घेणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले वरिष्ठ पोलिस उपधीक्षक श्री. अनिल बडगुजर साहेबांनी मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) करून आपल्या शैक्षणिक पदवीत पुन्हा एक मानाचा तुरा रोवला आहे. कायद्याचे रक्षण करताना त्याचेही सखोल ज्ञान असावे म्हणूनच त्यांनी आधी एलएलबी व धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमधून उच्च श्रेणीत एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. आवड असेल तर शिक्षणाला कोणतेही वय लागत नाही, हेही त्यांनी यातून दाखवून दिले. खान्देशात जळगाव, अमळनेर, धुळे येथे कार्यरत असताना आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलाच आहे. आणि समाज जीवनात वावरतांनाही त्यांनी चांगला सूर साधल्याने ते प्रत्येकाच्या काळजात अजूनही आठवणीत आहेत. म्हणून त्यांनी मिळवलेेल्या शैक्षणिक यशाने त्यांचे करिअर अधिकच चमकदार झाले आहे. अशा या दिलदार, सह्रुदयी साहेबांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Congratulation
Congratulations 💐💐