चोपडा – अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या विश्वस्त मंडळाच्या सभेत अध्यक्षीय परिषद व अखिल भारतीय पुरस्कार वितरणाचा संकल्प महासमितीचे अध्यक्ष श्री सुरेश शिवराम महाले यांनी जाहीर केला. चोपडा येथे विश्वस्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासमितीचे सचिव प्रा हिरालाल रघुनाथ बडगुजर यांनी वरील निर्णयाची माहिती दिली.
चोपडा येथे 31 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री सुरेश शिवराम महाले यांच्या अध्यक्षतेत विश्वस्त मंडळाची सभा संपन्न झाली. यावेळी चामुंडा माता प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर अध्यक्ष व सचिव यांच्यासह माजी अध्यक्ष श्री उमेश करोडपती, खजिनदार श्री पी. डी. बडगुजर, संघटक श्री सुधीर तुळशीराम बडगुजर, सहसचिव श्री भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह समिती प्रमुख, विश्वस्त व निमंत्रक निलेश बडगुजर ,संजय बडगुजर भुसावळ तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
सभेत समाजाच्या महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला. महासमितीच्या विद्यमाने सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे व अध्यक्षीय परिषदेचे स्वरूप ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. ही समिती या दोन्ही उपक्रमांचा मसुदा तयार करणार असून येत्या वर्षात हे दोन्ही कार्यक्रम समाजाला अर्पित करण्यात येणार आहेत.
सुरुवातीला मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे, जमाखर्चास मंजुरी देणे, आजीवन सभासदांना मंजुरी देणे, महासमितीच्या व उपसमितीच्या कामकाजाचा आढावा घेणे या विषयांवर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले.
महासमितीती अंतर्गत विविध समित्यांचा कार्य-अहवाल समिती प्रमुखांनी सादर केला. केंद्रातील बडगुजर समाजाला ओबीसी मिळण्याचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुका नंतर मार्गी लागेल, अशी माहिती ओबीसी समिती प्रमुख श्री धर्मेंद्र पोपट बडगुजर व उपप्रमुख रवींद्र पंडितराव बडगुजर यांनी दिली.

तसेच जळगाव येथे अखिल भारतीय वधू-वर परिचय मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. त्याबद्दल समितीचे प्रमुख श्री लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांनी सर्व विश्वस्त, निमंत्रक सदस्य, देणगीदार व समाज बांधवांचे आभार मानले.
महासमितीचे सचिव प्रा. एच. आर. बडगुजर, उपाध्यक्ष श्री दिलीप राघो बडगुजर व संघटक श्री सुधीर तुळशीराम बडगुजर यांचे राजीनामे विविध कारणांनी नामंजूर करण्यात आले.
सभेच्या प्रारंभी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सुरेश महाले यांच्या अध्यक्षतेत पहिली सभा संपन्न होत असल्यामुळे त्यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले. माजी सचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाली. श्री रवींद्र पंडितराव बडगुजर यांची बीजेपी ओबीसी मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्षपदी निवड झाली. सौ. स्वाती मिलिंद बडगुजर यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली. श्री अमित बडगुजर यांची राष्ट्रीय सिने चित्रपट कलाकार संघटनेच्या प्रदेश सचिव पदी निवड झाली. या सर्व मान्यवरांचा महासमितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सभेचे आयोजन व भोजन खर्च स्पॉन्सर केल्याबद्दल महासमितीचे सहसचिव भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे व श्री रवींद्र पंडितराव बडगुजर यांचे आभार मानण्यात आले व सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

Leave a Reply