पुणे येथ होणार्या भव्य त्रिराज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजकांनी औरंगाबाद, पिंपळगाव हरेश्वर, पाचोरा, जळगाव, चिंचोली, धुळे आणि नाशिक येथे जाऊन समाजातील प्रतिष्ठित नागरिक, समाज मंडळे आणि सर्व थरातील समाज बांधवांची भेट घेण्यात आली यावेळी सर्व स्तरात आणि उत्साह दिसून आला.
या भेटीमध्ये सर्व मंडळांनी, समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि वधु वर मेळाव्याच्या संकल्पनेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्यात.
“पुणे येथे होणारा हा तिसरा वधू- वर परिचय मेळावा असल्याने नेहमीप्रमाणे तुम्हाला आमचे सहकार्य व सहभाग नक्कीच मिळेल”, असे आश्वासन ही सर्व सर्व समाज मंडळांनी व समाज बांधवांनी दिले.
सर्वांच्या बोलण्यात असे दिसून आले की नोकरी व्यवसायासाठी आणि वास्तव्यासाठी जर पुण्याला प्रथम पसंती दिली जाते तर वधू वर मेळाव्यासाठी का नको? तसेच बहुतेक विवाह इच्छुक मुले- मुली हे पुणे परिसरात नोकरी-व्यवसाय निमित्ताने पुणे परिसरात राहतात.
यावेळी समाजातील विविध मान्यवर, जेष्ठ – प्रतिष्ठित व्यक्तींनी मौलिक सूचनाही दिल्यात आणि सहभागाचे आश्वासन दिले.
एकूणच या मेळाव्यास सर्व स्तरातून शुभ आशीर्वाद व शुभेच्छा लाभले व मदतीचे आश्वासन मिळाले.
आता आपण लवकरात लवकर विवाह इच्छुक वधू-वरांची नोंदणी करून रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या वधू मेळाव्यास उपस्थिती लावावी ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
आयोजक
बडगुजर बहुउदेशीय संस्था , पुणे
अध्यक्ष – श्री अनिल गणपत बडगुजर
सचिव – श्री रतीलाल बडगुजर
कार्याध्यक्ष – श्री भगवान दत्तात्रय बडगुजर
उपाध्यक्ष – श्री राजेंद्र वसंत बडगुजर
सर्व कार्यकरणी सदस्य, माजी पदाधिकारी,
पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील समस्त बडगुजर बांधव व
पुणे बडगुजर यंग ग्रुप
बडगुजर बहुउद्देशिय संस्थे मार्फत घेण्यात येणार्या वधू वर मेळाव्यात शुभेच्छा