प्रकाश रोखठोक असतो.
लपवा लपवी चा खेळ फक्त अंधरापाशीच असतो.
अंधार आणि आतल्या गाठीची माणसं सारखीच !
✒️ व.पु.काळे
“अशा पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती..”२६ जून व.पुं.चा स्मृतीदिन निमित्ताने..🍃विनम्र अभिवादन!
व.पु.आपल्यात नाहीत असं वाटतच नाही. आपल्या व.पुं. बद्दल मी काय लिहिणार? आयुष्याचा साधा सरळ अर्थ समजावून सांगताना त्याचा सोहळा करता यायला हवा, हेच त्यांच्या लिखाणावरून समजते. हल्लीच्या काळात एकमेकांशी होणारा संवाद कमी होत चालला आहे, जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपण उभे राहिले पाहिजे हे त्यांचे वाक्य कायम लक्षात राहील. निरोप घेणं ही काळजाला चटका लावणारी गोष्ट आहे. म्हणूनच तर व.पु. म्हणतात, ” नियती ज्या प्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याच प्रमाणे ते कोणाच्या येण्याने पूर्ण होणार याचं उत्तरही नियती जवळच असते.” कारण, सहवासाचा आनंद हा पैशातून मांडता येत नाही. व.पु. सर, तुमची कमी ही कधीच न भरणारी आहे. आज तुमच्या विषयी हे लिहिले गेलेले शब्द देखील भाग्यवान म्हटले पाहिजे. आज तुमचा स्मृतिदिन म्हणून दु:ख हे आहेच पण त्याचबरोबर तुम्ही पुस्तकरूपाने आमच्याशी संवाद साधत आहात, आमच्या मनातील भावना व्यक्त करत आहात असेच वाटते.म्हणूनच,आपण अनेकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झालेले आहात,यात काही शंकाच नाही..
┉❀꧁꧂꧁꧂❀┉


Leave a Reply