पनवेल, मुंबई येथील श्री. देविदास गंगाराम बडगुजर रिलायन्स कंपनी मधून सेवानिवृत्त – श्री. भगवान डोंगर बडगुजर सर

पनवेल, मुंबई येथे राहणारे व मुळगाव पिंगळवाडे, ता. अमळनेर येथील श्री. देविदास गंगाराम बडगुजर यांची काळ दिनांक 31 मे 2023 रोजी, रिलायन्स, पनवेल या कंपनी मध्ये ३४ वर्षे ९ महिने प्रदिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सन्मान समारोह रिलायन्स या कंपनीमध्ये काल रोजी पार पडला.

श्री देविदास गंगाराम बडगुजर यांचा जन्म दि . १/६/१९६५ रोजी झाला, त्यांनी अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधून B sc chemistry चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर रोहा येथे सुदर्शन केमिकल मध्ये त्यांनी “प्रोडक्शन सुपरवायजर ” या पदावर दोन वर्ष नोकरी केली.

पुढे त्यांनी पेट्रो केमिकल मध्ये पाताळगंगा येथील ” रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड” या कंपनीमध्ये “असिस्टंट जनरल मॅनेजर” या पदांवर त्यांनी नोकरी केली

यापुढे सप्टेंबर १९८८ पासून ते आज पर्यंत त्यांनी पनवेल येथील ‘रिलायन्स या नामांकित कंपनीमध्ये जॉब केला . सप्टेंबर १९८८ मध्ये “प्लांट ऑपरेटर” या पदावर सुरुवात केलेले श्री देविदास यांनी पुढे वेगवेगळ्या पदव्या तसेच अनुभव घेत “असिस्टंट जनरल मॅनेजर” या पदापर्यंत मजल मारली व आज ते या पदावरून निवृत्त झाले.

त्यांनी आपल्या आयुष्यातील 3४ वर्ष ९ महिने या कंपनीसाठी दिली. सध्या ते “LAB Production” या विभागात कार्यरत होते.

स्वभावाने शांत व मनमिळावू असलेल्या श्री देविदास यांना त्यांची पत्नी सौ . माया यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाची साथ दिली. तसेच मुलगी सौ सायली व जावई श्री. निरव शिवलालशेठ गिरनार हे उच्चशिक्षित असून सध्या बडोदा, गुजरात येथे राहत आहेत.

मुलगा रोशन हा सध्या अमेरिकेत एम. एस. चे शिक्षण पूर्ण करून Jercy City (USA)नोकरी करीत आहे

शुभेच्छांसाठी आपण संपर्क करू शकता श्री. देविदास गंगाराम बडगुजर  9967544525

गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले देविदास  यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त यांचे बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल आणि कोंकण परिसर, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*