आज २२ मे-भारतातील महान समाजसुधारक… “राजा राम मोहन रॉय” यांचा आज जन्म दिवस… जाणून घेऊया त्यांचे कार्य.
राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ते ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. राजा राम मोहन रॉय हे स्वातंत्र्यापूर्वी अनेक सामाजिक सुधारणा चळवळींमध्ये अतिशय सक्रिय भूमिका बजावताना दिसले.
राजा राम मोहन रॉय यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षा…
राजा राम मोहन रॉय यांचा जन्म १७७२ मध्ये ब्राम्हण समाजात बंगाल राज्यातील हुगली जिल्हयात अरंभग तालुक्यातील राधानगर इथं झाला. त्यांच्या परिवारात आपल्याला जातीय विभीन्नता बघायला मिळते. त्यांचे वडील रमाकांत वैष्णव धर्माचे होते तर आई तारिणीदेवी शिवैत परिवाराच्या होत्या.
राजा राममोहन रॉय यांचे एकुण तीन विवाह झाले, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यु बालपणातच झाला. त्यांच्या दुस-या पत्नीपासुन त्यांना दोन मुलं झाली १८०० मध्ये राधाप्रसाद आणि १८१२ मध्ये रामप्रसाद त्यांच्या दुस-या पत्नीचा मृत्यु १८२४ मध्ये झाला. त्यांची तिसरी पत्नी देखील जास्त काळापर्यंत जिवीत राहीली नाही, त्यांचे प्रारंभीक शिक्षणात बरेच चढ-उतार आले.
इतिहासकारांच्या सांगण्यानुसार राजा राममोहन रॉय यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले, तिथे त्यांनी बंगाली, संस्कृत, आणि पार्शियन भाषेचे ज्ञान अर्जित केले, त्यानंतर मदरसा येथे त्यांनी पार्शियन आणि अरेबिक भाषेचे ज्ञान प्राप्त केले, तत्पश्चात हिन्दु साहित्य आणि संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले.
तेथे गेल्यानंतर त्यांनी वेद उपनिषदांचा देखील अभ्यास केला वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना पटना इथं पाठवण्यात आलं आणि २ वर्षानंतर त्यांना बनारसला पाठवलं.
आधुनिक भारताचे रचियता म्हणुन राजा राममोहन रॉय यांच्याकडे बघीतलं जातं ब्राम्हो समाजाचे ते संस्थापक होते, जे भारताचे समाजवादी आंदोलन देखील होते. सतीप्रथा बंद करण्यात त्यांची मोलाची भुमिका होती. राजा राममोहन रॉय हे एक महान विव्दान आणि स्वतंत्र विचाराचे होते, त्यांनी इंग्लिश, विज्ञान, विदेशी औषधी आणि तंत्रज्ञानाची शिक्षा प्राप्त केली होती.
राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. राजनैतिक, सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं अमुल्य योगदान आहे. राजा राममोहन रॉय हे विशेषता हिन्दुंच्या सती प्रथे विरोधात सगळयांना परिचीत आहेत, त्या वेळी बंगाल मधे पती च्या निधनानंतर पत्नी ला सती संबोधले जाई आणि तीला सती जावे लागे.
सती प्रथेचा विरोध:
सतीप्रथा बंद करणे ही राजा राममोहन रॉय यांच्या जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी होती. अविरत परिश्रम करत त्यांनी ही कुप्रथा सरकार व्दारा बंद करून याला दंडनीय अपराध घोषीत केले, या अमानवीय प्रथेचे त्यांनी जोरदार खंडन केले, वृत्तपत्रातुन आणि सभांमधुन या आंदोलनाने त्याकाळी जोर धरला,
याला समाजाकडुन इतका विरोध होता की काही काळापर्यंत राजा राममोहन रॉय यांच्या जीवाला देखील धोका होता. शत्रु आणि विरोधकांना त्यांनी कधीच जुमानले नाही आणि त्यांच्या हल्ल्यांना देखील भीक घातली नाही. त्यांच्या सातत्यपुर्ण परिश्रमाचे हे फलित होते की लॉर्ड विलियम बेंटिक यांनी 1829 मध्ये सती प्रथा बंद केली.
भारतात इंग्लिश ऐवेजी संस्कृत आणि पार्शियन भाषा शिकवण्यावर जोर दिला.
1816 मध्ये त्यांनीच इंग्रजीत हिन्दुइस्म शब्दाचा शोध लावला. इतिहासात त्यांचे योगदान बघता भारतातील महत्वपुर्ण महापुरूषांमध्ये त्यांची गणना होते, ते नेहमी भारताला आणि हिंदुत्वाला वाचवण्याकरता ईस्ट इंडीया कंपनी विरोधात लढा देत राहीले, ब्रिटीश सरकारने तर त्यांना…
भारतीय नवजागरणाचे जनक ही पदवी दिली होती. ब्रिटिश सरकार ने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका रस्त्याचे नाव बदलुन राजा राममोहन वे असे ठेवले.
विश्वातील महत्वपुर्ण धर्मग्रंथ मुळ रूपात वाचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते, यामुळे सगळया महत्वपुर्ण धर्मग्रंथाची ते तुलना करू शकले, विश्वधर्माची त्यांची धारणा कोणत्याही सिध्दांतावर आधारीत नव्हती तर विभिन्न धर्माच्या गंभीर ज्ञानावर आधारीत होती. त्यांनी वेदाचे आणि उपनिषदाचे बंगाली भाषांतर सुध्दा केले, वेदांतावर इंग्रजीत लिखाण केल्याने युरोपात आणि अमेरिकेत त्यांचे बरेच नाव झाले आणि कौतुकही.
मुगल सम्राट दुसरा अकबर याने राम राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम “ब्रह्मपत्रिका” नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था,व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरातउल अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
आपल्या देशात अश्या महान विभुती जन्माला आल्या की ज्यांच्यामुळे जन माणसाला विचाराची नवी दिशा मिळाली. हे आपल्या देशाचे सद्भाग्य आहे की या महान लोकांमुळे समाज बदलला, नवी शिकवण अंगीकारली, नव्याची कास धरली.
सती प्रथा संपल्यामुळे राजा राममोहन रॉय मानवतावादी सुधारकांच्या रांगेत आले, २७ सप्टेंबर १८३३ ला इंग्लंड मधे राजा राममोहन रॉय यांचा मृत्यु झाला.
आधुनिक समाजाच्या निर्माणा करता त्यांनी ब-याच शाळा काढल्या होत्या ज्यामुळे जास्तीत जास्त लोक शिक्षीत व्हावेत ते आधुनिक सक्रीय महामानवच होते, नव्या भारताचे महान व्यक्तीमत्व होते.
पुर्व आणि पश्चिमी विचारधारेचा समन्वय साधत १०० वर्षांपासुन सुस्त असलेल्या भारताला जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले, ते त्या काळातील समाजाचे आणि त्या शतकाचे असे निर्माता होते की त्यांनी भारताच्या प्रगतीमधे बाधा ठरत असलेल्या सर्व समस्यांना दुर करण्याच काम केलं, मानवतावादाचे ते पुजारी होते, पुर्नजागृतीचे आणि सुधारवादाचे प्रथम जनक म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जाते.
अश्या महान समाज सुधारकाला माझा मराठी मनाचा मुजरा..!🙏
🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶



Leave a Reply