
बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी बुद्रुक ता. पाचोरा जि.जळगांव या संस्थेने व लोहारी बुद्रुक गावातील सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने अगदी कमी कालावधीत भव्य दिव्य असे उभारलेले चामुंडा मातेचे मंदिरास दिनांक १०/०५/२०२३ बुधवार रोजी वर्षपूर्ती होत आहे. मंदिराच्या ०१ ला वर्धापन दिनानिमित्त बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी बु।।. या संस्थेकडून दि. १० मे रोजी महाप्रसादाचे व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाजबांधवांना संस्थेकडून सस्नेह निमंत्रण असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी बुद्रुक ता. पाचोरा. यांना पहिल्या वर्धापनदिनानिमित्त बडगुजर. इन टिम कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


Leave a Reply