चलो लोहारी चलो लोहारी चलो लोहारी
अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा
अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणारे बडगुजर समाजाचे अखिल भारतीय महाअधिवेशन या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरील प्रत्येक गावातील, प्रत्येक शहरातील सर्व समाज बांधवांनी समाज मंडळांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या महाअधिवेशनास आवर्जून उपस्थिती रहावे. तसेच याविषयीची माहिती आपल्या समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने पोहोचवावी या उद्देशातून अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा यांनी १ जानेवारी 2023 रोजी श्री. जगन्नाथ संपत बडगुजर यांच्या घरी पारोळा समाज मंडळाची मासिक मीटिंग अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे मा. अध्यक्ष श्री. आप्पासौ उमेश करोडपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पारोळा समाज मंडळाचे अध्यक्ष: श्री. दिनेश बडगुजर, उपाध्यक्ष : श्री. सतीश बडगुजर, सचिव : श्री. संजय बडगुजर, खजिनदार : श्री. अर्जुन बडगुजर, माजी अध्यक्ष : प्रवीण बडगुजर, प्रसिद्धी प्रमुख : श्री. विनोद बडगुजर, संचालक : श्री. बापू बडगुजर, श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, श्री. एम. पी. बडगुजर, श्री. सुनील बडगुजर श्री. मोतीलाल बडगुजर, श्री. आत्माराम बडगुजर, श्री. बापू बडगुजर ( विचखेडे ) हे उपस्थित होते. यावेळी अधिवेशना करिता पारोळा येथून जास्तीत जास्त समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच अधिवेशन करिता पारोळा येथील ५०० समाज बांधव यांना उपस्थित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.






Leave a Reply