प्रतिष्ठा ने “मार्शल आर्ट-किक बॕक्सिंग” मधे उंचावली अलोणे परिवाराची प्रतिष्ठा – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

पिंपरखेड येथील कै भटेसिंग गोविंदा बडगुजर यांची नात व श्री.विशाल बडगुजर,पिंपरखेडचे नामवंत शेतकरी यांची कन्या कु. प्रतिष्ठा ही आपले काका डॉ.अनिरुध्द भटेसिंह बडगुजर,शहादा येथे,महावीर इंग्लीश मिडीयम स्कूल, {CBSE} शहादा (नंदूरबार) इ.१० वीत शिकत आहे.


आजीआजोबाचे संस्कार, आई-वडीलांचे व काका-काकूचे मार्गदर्शनात कु.प्रतिष्ठा शैक्षणिक वाटचालीसोबत मार्शल आर्ट(किक बॉक्सिंगमधे)रस घेत आहे.

नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मार्शल आर्ट (किक बॉक्सिंग) स्पर्धेत कु.प्रतिष्ठाने मालेगाव संघातील विद्यार्थीनीला धूळ चारत प्रथम क्रमांक पटकावला.


पिंपरखेड येथील अलोणे परिवार व बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून “मुलीने भटूअण्णाचे नाव उंचावले अशी चर्चा गावात रंगली आहे व खऱ्या अर्थाने अलोणे परीवाराची प्रतिष्ठा उंचावल्याचे चित्र आहे. पिंपररखेडा व परिसरांत सर्वत्र आनंदाचे वातावरण असून कु.प्रतिष्ठा व परीवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अ.भा.बडगुजर समाज महासमिती, बडगुजर.इन,बडगुजर प्रॉउड फॉउंडेन्शन, तथा बडगुजर समाजातर्फे कु,प्रतिष्ठाचे कोडकौतुक, अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा तसेंच अलोणे परीवाराचे हार्दिक अभिनंदन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*