एक कविता…..
मी आहे बाई
करू नको मला
अबला समजण्याची घाई
मी आहे बाई
मीच माया आणि ममता
मीच दुर्गा आणि सीता
मीच आहे कधी रणरागिणी लक्ष्मीबाई
मी आहे बाई
मीच आहे सरस्वती
मीच आहे सावित्री
मीच आहे ज्ञानेश्वराची विठाई
मी आहे बाई
कधी माता कधी भगिनी
कधी कन्या कधी पत्नी
मीच आहे जिची गोड वाटे अंगाई
मी आहे बाई
मला म्हणतात नाजूक नार
पण मीच होते कधी गंभीर
मीच आहे जी दुःखातही बळ देई
मी आहे बाई
दुःख आणि आनंद
कठिणातले कठीण घाव
पेलूनही खंबीर आधार होई
मी आहे बाई
कर्तृत्वाचा महामेरू
की एक अथांग डोह
सगळं काही सामावून घेई
मी आहे बाई
सहन करीत वेदना
पेरित मी संवेदना
भावनांना जाणीवांची फुंकर देई
मी आहे बाई
खळखळणारा झरा
ढळढळणारे काळीज
मीच आहे सगळ्या विश्वाची माई
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265



Leave a Reply