पारोळा, ह. मु. पुणे येथील, सौ.अश्विनी निलेश करोडपती (बडगुजर)या महिलेची पाक कला क्षेत्रात उत्तुंग भरारी

पुणे येथील सौ.अश्विनी निलेश करोडपती(बडगुजर) यांनी “मैत्रीण रेसिपीज् बाय अश्विनी बडगुजर” या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.याद्वारे पाककलेचे शिक्षण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचविणेच्या उद्देशाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

सौ अश्विनी,या पारोळा येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे माजी अध्यक्ष श्री.आप्पासाहेब उमेश हिरालाल करोडपती व सौ. मंगला उमेश करोडपती यांच्या स्नुषा तर भुसावळ येथील सौ.स्मिता व श्री. रमेश शिवराम महाले यांच्या सुकन्या, श्री. अशोक महाले व अ.भा. महासमितीचे अर्थ नियोजन समिती अध्यक्ष श्री.सुरेश शिवराम महाले यांची पुतणी,तसेंच पुणे येथील इंजिनिअर श्री.निलेश उमेश करोडपती यांच्या सुविद्य पत्नी आहेत. श्री. निलेश करोडपती हे इंजिनिअर असून Multi National Company Honeywell मध्ये ते उच्च पदावर कार्यरत आहेत. श्री. निलेश यांनी बऱ्याचशा समाजबांधवांना नोकरी साठी मार्गदर्शन करीत असतात.
पारोळेकर करोडपती परीवार व भुसावळकर महाले परीवार बडगुजर समाजास ज्ञात आहेतच. दोन्ही परीवाराकडून शैक्षणिक, वैद्यकीय, तंत्रज्ञान तथा सहकार्याचे क्षेत्रात भरीव समाजकार्य प्राध्यान्याने चालू आहे.
लॉकडाऊन च्या काळात सौ.अश्विनी करोडपती (बडगुजर)यांनी पाककलेचे शिक्षण जास्तीत जास्त महिला व अनेक युवायुवती राज्यात,देश-परदेशात शिक्षणा तथा नोकरी निमित्तांनं राहत असतात…अश्या सर्व गरजवंतांसाठी यूट्यूब च्या माध्यमातून पाककलेचे ज्ञानार्जन करता यावं यासाठी नाविन्यपूर्ण “मैत्रीण रेसिपीज बाय अश्विनी बडगुजर” यूट्यूब चॕनेलव्दारे पाककलेचे ज्ञानार्जन केले असून,सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सदर चॕनलद्बवारे घरात बसून नवनवीन,चटपटीत रेसिपीज बनविण्यासाठी, सौ.अश्विनी बडगुजर यांनी सर्व खव्वय्यासाठी मेजवानीदाखल नवनवीन रेसिपीज अपलोड केलेले असून करत आहेत,वा त्यांच्या प्रतत्नांना खव्वय्ये व महिलांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे व ते यथायोग्य लाभ घेत आहेत.

रोजरोज नवीन ताजीतवानी डीश l
लॉकडॉऊन काळात खव्वय्यांना घरात मिळणेची वुईश ll

अश्विनी बडगुजर ची एकच ख्वाईश l
गरजवंतांनी अवश्य करावी फर्माईश ll

बडगुजर समाज खव्वयासाठीही अग्रेसर l
सरसावले करोडपती महाले परीवार फूड प्रोसेसर ll

यू ट्युबवर नवनवीन रेसिपींची चलती l
त्यायोगे बडगुजर समाजाची सर्वत्र किर्ती ll

सदर नाविन्यपूर्ण उपयुक्त चॕनलमुळे बडगुजर समाज खव्वय्यासांठी अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. सौ. अश्विनी बडगुजर यांचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://youtube.com/channel/UCWwqtdWtXFQd2k2ry-hTwlw

तसेच या विषयाची माहिती आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा.

सौ.अश्विनी बडगुजर व दोन्ही परीवाराचे अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉउड गृप व बडगुजर.इन टीम च्या वतीने हार्दिक अभिनंदन व खव्वय्यांना चटपटीत तसेच उत्तमोत्तम रेसिपीज सदर चॕनेलतर्फे दररोज मिळोत अश्या शुभेच्छा.

https://youtube.com/channel/UCWwqtdWtXFQd2k2ry-hTwlw

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*