सोनशेलू येथील युवा उद्योजक, शिक्षक, समाजिक कार्यकर्ते, चामुंडा माता ट्रस्ट चे अध्यक्ष, युवक समिती सदस्य श्री. धिरज बडगुजर यांच्या सहचारिणी सौ. प्रियंका धिरज बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायतीच्या संरपच पदी निवड करण्यात आली.
सरपंच पदाची सोडत काढण्यात आली त्यात सोनशेलु ग्रामपंचायत ओबीसी महिला राखीव निघाली
नुकत्याच झालेल्या सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणूकीत त्या आपल्या वार्डातून ओबीसी महिला सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या.त्यांची सामाजिक बांधिलकी व गांवाला विकसित करण्याच्या मानस आहे त्यां एकमेव महिला ओबीसी असल्याने सरपंच पदासाठी निर्विवाद निवड केली.
सौ. प्रियंका ताईंच्या या यशात त्यांचे पती श्री. धिरज बडगुजर व संपूर्ण परिवाराचे तसेच सर्व हितचिंतकांचे मोठे योगदान लाभले.
सोनशेलू गावात पहिल्या युवा महिला सरपंच म्हणून त्यांची निवड झाल्या बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे आम्ही नवनिर्वाचित सरपंच सौ. प्रियंका ताईंचे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.


Leave a Reply