नमस्कार समाज बंधू भगिनी
आज आपण बघत आहोत की समाजात अनेक विषयावर चर्चा ही होत असते व त्या विषयी जेष्ठ समाज बांधव विचार विनिमय करून ते विषय संपवतात..
पण ज्वलंत विषय म्हणजे केंद्रातील OBC आरक्षण यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिति अंतर्गत OBC समिती कडून काही मुद्दे व माहिती समाजाला अवगत व्हावी यासाठी खाली एक निवेदन पत्र OBC समिती मार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे OBC समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचावी हीच अपेक्षा?



ओ बी सी समिती प्रमुख श्री पी आर बड गुजर सरांनी आज पर्यंतचा अहवाल व केंद्रीय आयोगाशी केलेल्या पाठपुरावा सविस्तर सादर केला सर्व मध्यम व तारीख अन्वये संदर्भ दिलेला आहे सदर कार्यात पाठपुरावा सुरू आहे कोणत्याही प्रकार च संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी कार्यास मनपूर्वक शुभेच्छा