वाघोदा ता. रावेर येथील प्रा. राजेश बडगुजर यांचा चिरंजीव डॉ. तेजस बडगुजर हा बी. ए. एम्. एस्. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

वाघोदा (रावेर) : येथील श्री.पितांबर शंकर बडगुजर,सेवानिवृत्त शिक्षक यांचा नातू आणि प्रा.राजेश बडगुजर व सौ.सुनीता बडगुजर, प्राथमिक शिक्षिका यांचा थोरला मुलगा डॉ.तेजस BAMS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेने वाघोदे या खेडेगावात जल्लोषाचे वातावरण झालेले आहे. लहानपणा पासून तेजस चपलक बुध्दीचा होता. इ.१ली ते ४थी चे शिक्षण जि.प. प्राथमिक शाळेत तर ५वी ते १०वी सावदा येथे आणि ११-१२वी कनिष्ठ महाविद्यालय,मोठे वाघोदे येथे घेऊन एका लहानश्या खेडेगावातील मुलगा डॉक्टर झाल्याचे गावात कळलेवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाघोदे,सावदा-फैजपूर, यावल,रावेर परिसरातील बडगुजर समाजातर्फे डॉ.तेजस चे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.तेजस हा एक अभ्यासू विद्यार्थी असून आजी आजोबा व आईवडिलांच्या मार्गदर्शनाने त्याने हे यश संपादन केले. वाघोदा गावात आपल्या परिवाराची एक वेगळी ओळख त्याच्या या यशामुळे होत आहे. वडिलांप्रमाणेच तेजस हा अतिशय प्रेमळ व शांत स्वभावाचा असून त्याने आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करत प्रथम श्रेणीत यश संपादन केले. वडील समाजकार्यात पण सक्रिय सहभाग नोंदवित असतात त्यांच्या सहकार्याने बडगुजर समाजातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगांव येथे दिल्ली येथील प्रसिद्ध स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक मा. प्रा. श्री. मधुकर कोटवे सर यांचा कार्यक्रम आयोजन करण्यास मदत लाभली होती. असेच काही समाजासाठी आणि गावासाठी शक्य ती मदत गरजेच्या वेळी करेल अशी प्रतिक्रिया त्याने अभिनंदन करतांना दिली. तसेच त्याने ज्यांनी त्याला मार्गदर्शन केले त्या सर्वांचे आभार मानले.

अ.भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्रॉउड गृप व वेब पोर्टल टीम तर्फे सदर यशप्राप्तीची बद्दल व डॉ.तेजस बडगुजर चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

डॉ. तेजस राजेश बडगुजर, वाघोदा

2 Comments

  1. Hearty congratulations Dr. Tejas. We are really proud of you.
    प्रा. राजेंद्र भाऊ, सौ. वहिनी, श्री. मामा व सौ. मामी यांचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
    चि. डॉ. तेजस ला पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*