रविवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी डिजिटल वधू-वर मेळाव्याचा झुम मिटींग च्या माध्यमातून वाजला बिगुल ! – श्री. दिपक बडगुजर, वसई

डिजिटल वधू वर मेळावा आयोजना संदर्भात रविवारी भरगच्च झूम मीटिंग झाली यात तब्बल ७९ समाज बांधव उपस्थित होते.

?धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, अमरावती, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील बांधवानी उत्फुर्त सहभाग घेतला. त्यात आयोजन, नियोजन यावर सखोल चर्चा झाली. अनुभवी बांधवानी आपली मते मांडली. त्यात प्रा. हिरालाल बडगुजर यांनी संवाद साधला.

तसेच या कार्यक्रमासाठी विविध प्रभागानुसार प्रतिनिधी (पालकमंत्री) नांव घोषित करण्यात आले.

डिजिटल वधू वर मेळाव्याची लगबग सुरु झाली असून रविवारी झालेलया भरगच्च झूम मीटिंग मध्ये काही प्रमुख शिलेदारांची घोषणा करण्यात आली.
?वधू-वर असल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री निवडण्यात आला आहे. त्यात समाजाची सांस्कृतिक राजधानी धुळे -प्रा. हिरालाल बडगुजर, राजकीय राजधानी जळगाव श्री. रंगराव नथ्थु बडगुजर, वीरभूमी नंदुरबार – श्री. दिलीप राघो बडगुजर, धर्मभूमी नाशिक – श्री. महेश बडगुजर, वऱ्हाडी ठसका विदर्भ सौ. स्वाती दिलीप बडगुजर, परदेशस्थ बांधव श्री. लोकेश कोतवाल आणि समाज घडामोडींचे केंद्र मुंबई श्री. दिपक बडगुजर यांची निवड करण्यात आली. तसेच रणरागिणी अर्थात महिला मंत्री – सौ. नंदिनी बडगुजर आणि युवकांचे आशास्थान युवा मंत्री श्री. अमित बडगुजर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

?अन्य विभागांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व शिलेदारांचे ऊत्कर्ष मंडळातर्फे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले !

?सदर कार्यक्रमात श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, श्री. सतीश दिगंबर बडगुजर, श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर, श्री. सुनिल बडगुजर आदी बांधवानी विविध सूचना करून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. ज्ञानेश्वर मोराडीया यांनी तयार केलेली नमुना क्लिप दाखवण्यात आली. जागतिक स्तरावर प्रथमच होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

?डिसेंबरच्या अखेरीस हा मेळावा आयोजित केला होणार आहे. याची औपचारिक घोषणा उत्कर्षचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण बडगुजर यांनी केली. मंडळाचे सचिव श्री. रमाकांत बडगुजर यांनी आभार मानले.

तसेच मंडळातर्फे आयोजित केलेल्या डिजिटल वधू-वर मेळावा बोधचिन्ह आणि घोषवाक्याच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

घोषवाक्य (slogan)
प्रथम क्रमांक : चंदन प्रवीण बडगुजर

‼️ऑनलाईन स्वयंवर बडगुजरांचे ‌‼️
‼️अनोखे मनोमिलन वधू- वरांचे ‼️?

द्वितीय क्रमांक :
लोकेश कोतवाल, पुणे

माझा बडगुजर समाज आयडियल l
योजितो वधु – वर मेळावा डिजिटल ll

तृतीय क्रमांक :
अमोल नंदवाळकर.

आम्ही बडगुजर ,वधू – वर कोरोनावर करुनी मात,
डिजिटल मेळाव्यास देऊनी साथ-बांधू सप्त जन्माची गाठ.

तृतीय क्रमांक :
सौ. मनीषा चंद्रकांत बडगुजर

वर –वधु परिचय सोहळ्याने समाज क्रांती घडवू या l
डिजिटल तंत्रज्ञानाची साथ घेऊनी संघटीत होऊ या ll

बोधचिन्ह (logo)

प्रथम क्रमांक : अनामिका बडगुजर , बदलापूर

द्वितीय क्रमांक: सौ. पौर्णिमा मयूर बडगुजर,

तृतीय क्रमांक : सौ. ज्योती नीलकंठ बडगुजर, धुळे रोड, चाळीसगांव

या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ शिक्षिका सौ. नंदिनी बडगुजर यांच्या टीम ने केले.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन या स्पर्धेत ३० पेक्षा अधिक जणांचा सहभाग लाभला असून सर्व कलाकृती डिजिटल मेळाव्यात प्रदर्शित होतील.

सर्व विजेत्यांचे ऊत्कर्ष मंडळ, युवक समिती व प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*